yuvraj singh  yandex
Sports

Yuvraj Singh Playing 11: युवराज सिंगने निवडली ऑल टाईम बेस्ट प्लेइंग 11! धोनीऐवजी या खेळाडूला दिलं स्थान

Yuvraj Singh All Time Playing XI: भारतीय संघातील माजी फलंदाज युवराज सिंगने आपली ऑल टाईम बेस्ट प्लेइंग ११ निवडली आहे.

Ankush Dhavre

भारतीय संघाला आयसीसीच्या महत्वाच्या स्पर्धांमध्ये विजय मिळवून देण्यात युवराज सिंगने महत्वाची भूमिका बजावली आहे. नुकतेच वरिष्ठ भारतीय संघातील दिग्गज खेळाडूंनी वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लेंजेंड्स स्पर्धेत जेतेपदाला गवसणी घातली आहे. ही स्पर्धा जिंकून देण्यातही त्याने मोलाची भूमिका बजावली आहे. दरम्यान ही स्पर्धा झाल्यानंतर युवराज सिंगने ऑल टाइम बेस्ट प्लेइंग ११ निवडली आहे. ज्यात एमएस धोनीला स्थान देण्यात आलेलं नाही.

युवराज सिंगने टीव्ही अँकर शेफाली बग्गाला दिलेल्या मुलाखतीत आपल्या ऑल टाइम ग्रेट प्लेइंग ११ ची घोषणा केली आहे. या प्लेइंग ११ मध्ये त्याने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची सलामीवीर फलंदाज म्हणून निवड केली आहे. तर जोडीदार म्हणून त्याने ऑस्ट्रेलियाचा दिग्गज खेळाडू रिकी पाँटिंगला प्लेइंग ११ मध्ये स्थान दिलं आहे. तर भारताचे स्टार खेळाडू रोहित शर्माला तिसऱ्या स्थानी आणि विराट कोहलीची चौथ्या स्थानी निवड केली आहे.

युवराज सिंगने पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी दक्षिण आफ्रिकेचा माजी खेळाडू एबी डिव्हिलियर्सची पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी निवड केली आहे. तर ६ व्या क्रमांकावर यष्टिरक्षक फलंदाज म्हणून त्याने ॲडम गिलख्रिस्टला स्थान दिलं आहे.

यासह युवराज सिंगने सातव्या क्रमांकावर अँड्र्यू फ्लिंटॉफची निवड केली आहे. ज्यावेळी दोघेही क्रिकेट खेळायचे त्यावेळी या दोघांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळाली होती. मात्र आता आपल्या ऑल टाइम प्लेइंग ११ मध्ये युवराजने त्याला स्थान दिलं आहे. तर फिरकी गोलंदाज म्हणून त्याने मुथय्या मुरलीधरन आणि शेन वॉर्नची निवड केली आहे. तर वसीम अक्रम आणि ग्लेन मॅकग्रा यांची वेगवान गोलंदाज म्हणून निवड केली आहे. त्याने स्वतःला १२ वा खेळाडू म्हणून संघात स्थान दिलं आहे.

युवराज सिंगने निवडलेली ऑल टाईम बेस्ट प्लेइंग ११:

सचिन तेंडुलकर, रिकी पाँटिंग, रोहित शर्मा, विराट कोहली, एबी डिव्हिलियर्स, अॅडम गिलख्रिस्ट (यष्टीरक्षक), अँड्रयू फ्लिंटॉफ, शेन वॉर्न, मुथय्या मुरलीधरन, ग्लेन मॅकग्रा, वसीम अकरम, युवराज सिंग (१२ वा खेळाडू)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

GK: 'या' देशात विद्यार्थी स्वतः शौचालये स्वच्छ करतात

HBD Ranveer Singh : वाढदिवस अन् सर्व इन्स्टाग्राम पोस्ट डिलीट; रणवीर सिंहचं नेमकं चाललंय तरी काय?

Dates Benefits: खजूर खाण्याचे हे ७ फायदे माहितीयेत का?

Mumbai Shocking : मुंबई हादरली ! १५ वर्षीय मुलीवर जन्मदात्या वडिलांकडून बलात्कार, आईचाही समावेश

Shravana 2025: श्रावणात शिवलिंग पूजा करताना 'या' ७ वस्तू टाळा, होऊ शकतो अपशकुन

SCROLL FOR NEXT