team-india saam tv news
क्रीडा

IND vs SA, T20I Series: 'ते खोटं बोलताहेत..',पहिला टी-२० सामना रद्द होताच सुनील गावसकर बोर्डावर भडकले

Ankush Dhavre

Sunil Gavaskar Gets Angry:

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील ३ टी-२० सामन्यांच्या मालिकेला प्रारंभ झाला आहे. मालिकेतील पहिला टी-२० सामना पावसामुळे रद्द करण्यात आला आहे. हा सामना डरबनच्या मैदानावर खेळला जाणार होता. मात्र सततच्या पावसाने नाणेफेकीशिवाय सामना करण्याचा निर्णय घेतला गेला. दरम्यान हा सामना रद्द होताच माजी भारतीय क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनी संताप व्यक्त केल्याचे पाहायला मिळाले आहे. (IND vs SA T20I Series)

हा सामना सुरु होण्यापूर्वीच डरबनमध्ये पाऊस सुरु होता. त्यामुळे नाणेफेक होऊ शकलं नाही. दरम्यान पाऊस सुरु असताना संपूर्ण मैदान पूर्णपणे कव्हर न केल्याने सुनील गावसकर दक्षिण आफ्रिका बोर्डावर संताप व्यक्त केला आहे.

सुनील गावसकर (Sunil Gavaskar) यांनी 'स्पोर्ट्स तक'वर चर्चा करताना म्हटले की,'सर्व क्रिकेट बोर्डला पैसा मिळतो. जर ते म्हणत असतील पैसा मिळत नाहीये, तर ते खोटं बोलताहेत. त्यांच्याकडे बीसीसीआय इतके पैसे नसतील. मात्र प्रत्येक बोर्डकडे इतका पैसा असतो की, ते मैदान झाकण्यासाठी कव्हर्स खरेदी करु शकतात.' (Latest sports updates)

दक्षिण आफ्रिका बोर्डावर टीका करत असताना त्यांनी ईडन गार्डन्स मैदानाचं तोंडभरून कौतुक केलं आहे. ते म्हणाले की,'मला आठवतंय की, ईडन गार्डनच्या मैदानावर कसोटी सामना सुरु होता. हा सामना सुरु होण्यापूर्वी काही अडचण निर्माण झाली होती. या कारणामुळे मैदान पू्र्णपणे कव्हर करण्यात आलं होतं. त्यावेळी सौरव गांगुली इन्चार्ज होते. स्टेडियमवर कोणीही बोट दाखवू नये यावर त्यांनी भर दिला.

दुसरा टी-२० सामना कधी?

भारत आणि दक्षिण आफ्रिया यांच्यातील पहिला कसोटी सामना पावसामुळे रद्द करण्यात आला आहे. तर मालिकेतील दुसरा कसोटी सामना येत्या १२ डिसेंबर रोजी ग्केबरहातील सेंट जॉर्ज पार्कच्या मैदानावर खेळला जाणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

UPI स्कॅम कसा ओळखायचा? तुमचे पैसे सुरक्षित करण्यासाठी या टिप्स करा फॉलो

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

SCROLL FOR NEXT