Bacchu Kadu On Sachin Tendulkar  Saam tv
Sports

Bacchu Kadu On Sachin Tendulkar: मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरविरोधात बच्चू कडू करणार नारळपान आंदोलन; नेमकं कारण काय?

Bacchu Kadu Statement: बच्चू कडू यांनी सचिन तेंडुलकरला १५ दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे.

Ankush Dhavre

Sachin Tendulkar Online Gaming Advertisement:

भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडूलकर क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर आता जाहिरांतीमध्ये झळकताना दिसतोय. सचिन ऑनलाईन गेमला प्रमोट करणाऱ्या जाहिरांतीमध्ये देखील झळकतोय त्यामुळे राज्याचे माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी या जाहिराती करणं न थांबवल्यास सचिनविरोधात आंदोलन करू असा इशारा दिला आहे.

राज्याचे माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी सचिन तेंडुलकरला १५ दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे. सचिन तेंडुलकर ऑनलाईन गेमची जाहिरात करतोय त्यामुळे हे जाहिरात करणं सचिनने बंद करावं अन्यथा आंदोलन करू असा इशारा बच्चू कडू यांनी दिला आहे.

माध्यमांशी संवाद साधताना बच्चू कडू म्हणाले की, सचिन तेंडुलकर यांनी ऑनलाइन गेम ची जाहिरात केली आहे ते भारतरत्न असताना त्याचा परिणाम सामान्य लोकांवर होत आहे. या ऑनलाइन गेममुळे अनेक लोकांचे जीव गेले लोकांनी आत्महत्या केल्या आहेत. सचिन तेंडुलकर भारतरत्न आहेत त्यामुळे त्यांनी ती जाहिरात मागे घ्यावी.ही जाहिरातच मागे घेऊनऑनलाइन गेमच्या विरोधात वक्तव्य करावं अस आमचं मत आहे.'असं स्पष्ट मत बच्चू कडू यांनी व्यक्त केलं आहे. (Latest sports updates)

सचिनविरूद्ध नारळ पाणी आंदोलन..

सचिनने ही जाहिरात करणं थांबवलं नाही तर आम्ही नारळपान देऊ असं देखील बच्चू कडू म्हणाले आहेत. याबाबत बोलताना ते म्हणाले की, 'आम्ही सचिन तेडुंलकरच्या घरासमोर जाऊन नारळपान आंदोलन करू शकतो. भारतीय या ऑनलाईन गेमपासून मु्क्त व्हावे म्हणून आम्ही त्यांना नारळपान देऊ. आम्ही नेहमी हटके स्टाईलने आंदोलन करतो. यावेळी ही आमचं आंदोलन हटके असणार आहे. लोकं सुपारी देतात आम्ही नारळ देऊ आणि जाहिरातच नाहीतर ऑनलाईन गेम बंद करा अशी विनंती करू.'असं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे.

'सचिन तेंडुलकर भारतरत्न आहेत त्यामुळेच आम्ही या जाहिरातीच्या विरोधात आहोत. तर जे भारतरत्न नसते तर आम्ही आंदोलन केलं नसतं. या जाहिरातीतून माघार घेण्यासाठी आम्ही त्यांना १५ दिवसांचा अल्टिमेटम देतोय. त्यानंतर आम्ही आंदोलन करू.' असा इशारा बच्चू कडू यांनी दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

महाराष्ट्रासाठी मी रक्त सांडलं, तेव्हा तुमचे योद्धे कुठं होते? २६/११ च्या हल्ल्यातील हिरोचा राज ठाकरेंना सवाल

Rat Bite: पावसाच्या पाण्यातून चालताना उंदिर चावला? ही खबरदारी घ्या

Shirpur News : झोपेतच काळाचा घाला; घराचे छत कोसळले, छताखाली दबून वृद्धेचा मृत्यू, नातू व आजोबा गंभीर

Maharashtra Live News Update: शिर्डी माझे पंढरपूर! आषाढी निमित्ताने शिर्डीत साई भक्तांची मांदियाळी

Ashadh Wari: जांभळावर साकारला विठ्ठल! चांदवडच्या शिक्षकाची भक्ती आणि पर्यावरणाचा संदेश देणारी आगळीवेगळी कलाकृती|VIDEO

SCROLL FOR NEXT