aakash chopra saam tv news
Sports

IND vs ENG Test Series: 'रहाणे,पुजाराकडून काहीतरी शिका..' माजी क्रिकेटपटू इशान- अय्यरवर भडकला

Aakash Chopra Statement: केवळ इशान किशन नव्हे तर असे बरेच क्रिकेटपटू आहेत जे संघाबहेर आहेत मात्र रणजी ट्रॉफी स्पर्धा खेळत नाहीये.

Ankush Dhavre

Aakash Chopra On Ishan Kishan And Shreyas Iyer:

भारताचा युवा फलंदाज इशान किशन दक्षिण आफ्रिका दौऱ्यापासून संघाबाहेर आहे. त्याने मानसिक थकवा जाणवत असल्याने विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला होता. बीसीसीआयने त्याच्या विनंतीला मान दिला आणि त्याला विश्रांती दिली.

संघाबाहेर असताना त्याने रणजी ट्रॉफी स्पर्धेकडे पाठ फिरवत आयपीएल स्पर्धेची तयारी सुरू केली आहे. केवळ इशान किशन नव्हे तर असे बरेच क्रिकेटपटू आहेत जे संघाबहेर आहेत मात्र रणजी ट्रॉफी स्पर्धा खेळत नाहीये. अशा खेळाडूंवर भारताचा माजी क्रिकेटपटू आणि समालोचक आकाश चोप्रा भडकला आहे.

आपल्या स्पष्ट वक्तव्यांसाठी नेहमीच चर्चेत असलेल्या आकाश चोप्राने आपल्या युट्यूब चॅनेलवरून युवा खेळाडूंना चांगलंच फटकारलं आहे. तो म्हणाला की, ' मी ऐकलंय की, अनेक युवा खेळाडू रणजी ट्रॉफी स्पर्धेकडे पाठ फिरवत आहेत. या खेळाडूंचं नाव आयपीएलमध्ये असल्याने हे खेळाडू रणजी ट्रॉफी खेळण्यास नकार देत आहेत. या खेळाडूंनी ठरवलंय की,आयपीएलमध्ये चांगली कामगिरी केली की, भारतीय संघात स्थान मिळतं. ही मुळीच चांगली बाब नाही. कारण याच स्पर्धेत अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा देखील खेळत आहेत.' (Cricket news in marathi)

तसेच तो पुढे म्हणाला की, ' प्रथम श्रेणी क्रिकेट सुरू आहे. तुम्ही जर फिट आहे आणि संघाबाहेर आहे तर तुम्ही ते खेळायला हवं. जर तुम्हाला असं वाटत असेल की, प्रथम श्रेणी क्रिकेट न खेळता तुम्हाला संघात स्थान मिळेल. तर अशा खेळाडूंना ताकीद देण्याची गरज आहे की, आधी प्रथम श्रेणी क्रिकेट मग भारतीय संघात स्थान.’

बीसीसीआयने, इशान किशन, श्रेयस अय्यर, क्रुणाल पंड्या आणित दीपक चाहरला १६ फेब्रुवारीपूर्वी रणजी संघासोबत जोडला जाण्याचा सल्ला दिला आहे. तसेच राहुल द्रविडनेही म्हटलंय की, इशान किशनला जर संघात कमबॅक करायचं असेल तर त्याला कुठल्याही प्रकारचं क्रिकेट खेळावं लागेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shaktipeeth Expressway :'शक्तीपीठ' ठरणार पांढराहत्ती? शेतकऱ्यांचं नुकसान, शेकडो गावांना फटका बसणार; राजू शेट्टींनी सांगितले विकासाचे अडथळे

Satara News: थरारक! साताऱ्यातील खंबाटकी घाटात ट्रकचा जळून कोळसा; वाहतूक ठप्प, VIDEO

IMD Rain Alert : महाराष्ट्रातील कोकण, विदर्भ, मराठवाडासह देशभरात ७ दिवस मुसळधार पावसाचा इशारा

Hindi Language Controversy: मला मराठी येत नाही, ताकद असेल तर महाराष्ट्रातून हाकलून द्या; केडियानंतर राज ठाकरेंना अभिनेत्याचं ओपन चॅलेंज

Maharashtra Politics : राज ठाकरे संपूर्ण भाषणात कुठेही 'ते' वाक्य बोलले नाही; एकनाथ शिंदेंच्या बड्या नेत्याचा थेट मुद्द्याला हात

SCROLL FOR NEXT