भारत आणि इंग्लंड या दोन्ही बलाढ्य संघांमध्ये नुकताच ५ कसोटी सामन्यांची मालिका पार पडली. या मालिकेतील पहिल्या सामन्यात इंग्लंडने बाजी मारली. त्यानंतर पुढील चारही सामने भारतीय संघाने जिंकले आणि मालिका ४-१ ने आपल्या नावावर केली. मालिकेतील शेवटचा सामना धरमशालेत पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने १ डाव आणि ६४ धावांनी विजय मिळवला. इंग्लंडच्या या सुमार कामगिरीनंतर दिग्गज खेळाडूने पराभवाचं कारण सांगत खेळाडूंवर जोरदार टीका केली आहे.
इंग्लंडच्या पराभवाचं नेमकं कारण काय?
इंग्लंडने बॅझबॉल स्टाईल खेळ करत ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड सारख्या बलाढ्य संघांना पराभूत केलं. त्यामुळे असं वाटलं होतं की, इंग्लंडचा संघ भारतीय संघालाही बॅझबॉल स्टाईलने पराभूत करेल. मात्र असं काही झालं नाही. हैदराबादमध्ये मिळवलेल्या विजयानंतर इंग्लंडला विशाखापट्टणम, राजकोट, रांची आणि धरमशाला कसोटीत पराभवाचा सामना करावा लागला आहे. या चारही सामन्यांमध्ये इंग्लंडचे फलंदाज पूर्णपणे फ्लॉप ठरले. त्यामुळेच इंग्लंडला ही मालिका गमवावी लागली आहे.
इंग्लंडचा माजी खेळाडू मायकल वॉनने द टेलीग्राफच्या स्तंभात लिहिले की, ' हे खूप निराशाजनक आहे. त्यांच्याकडे हे करून दाखवण्याची क्षमता आहे आणि हे त्यांनी सिद्ध देखील करून दाखवलं. त्यांनी गेल्या २ मालिका जिंकल्या आहेत. मात्र यावेळी त्यांची फलंदाजी पूर्णपणे फ्लॉप ठरली.' (Cricket news in marathi)
तसेच त्यांनी पुढे लिहिले की, ' हे खूपच निराशाजनक आहे. इंग्लंडचा संघ कट्टर प्रतिस्पर्धी बनू शकतो. मात्र फ्लॉप फलंदाजीमुळे त्यांना या मालिका गमवाव्या लागल्या आहेत.'
शेवटच्या कसोटी सामन्यात बेन स्टोक्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडचा डाव २१८ धावांवर संपुष्टात आला. या धावांच्या प्रत्युत्तरात भारतीय संघाने ४७७ धावांचा डोंगर उभारला. या धावांच्या प्रत्युत्तरात इंग्लंडचा संघ १९५ धावा करू शकला. यासह भारतीय संघाने हा सामना १ डाव आणि ६४ धावांनी जिंकला.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.