Cricket  x
Sports

Cricket : प्रसिद्ध क्रिकेटपटूचे निधन, Ind Vs Eng कसोटी सामन्यादरम्यान खेळाडूंनी वाहिली श्रद्धांजली

Ind Vs Eng 1st Test : भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी दोन्ही संघातील खेळाडूंनी दंडावत काळी पट्टी बांधली. इंग्लंडचे माजी वेगवान गोलंदाज डेव्हिड लॉरेन्स यांना सर्व खेळाडूंनी श्रद्धांजली वाहिली.

Yash Shirke

David Lawrence : इंग्लंडचे माजी वेगवान गोलंदाज डेव्हिड लॉरेन्स यांचे वयाच्या ६१ व्या वर्षी निधन झाले. लॉरेन्स हे इंग्लंडकडून क्रिकेट खेळणारे ब्रिटीश वंशाचे पहिले कृष्णवर्णीय क्रिकेटपटू होते. मागील काही महिन्यांपासून ते मोटर न्यूरॉन आजाराशी झुंजत होते. आज २२ जून रोजी लॉरेन्स यांची प्राणज्योत माळवली. लॉरेन्स यांना सिड या टोपणनावाने ओळखले जात असे.

तेंडुलकर अँडरसन ट्रॉफीतील पहिला भारत विरुद्ध इंग्लंड सामना सध्या सुरु आहे. या सामन्याच्या तिसऱ्या दिवशी भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघातील खेळाडूंनी दंडावर काळी पट्टी बांधत डेव्हिड लॉरेन्स यांना श्रद्धांजली वाहिली. बीसीसीआयनेदेखील ट्वीट करत लॉरेन्स यांनी श्रद्धांजली वाहिली. 'लॉरेन्स यांचे रविवारी (२२ जून) निधन झाले. २०२४ मध्ये त्यांना एमएनडी आजाराचे निदान झाले होते, अशी माहिती बीसीसीआयने दिली.

डेव्हिस लॉरेन्स यांनी १९८८ ते १९९२ या कालावधीत इंग्लंडसाठी पाच कसोटी आणि एक एकदिवसीय सामना खेळला होता. पाच कसोटी सामन्यात त्यांनी १८ विकेट्स घेतल्या होत्या. लॉरेन्स यांनी १८५ प्रथम श्रेणी क्रिकेट सामन्यांमध्ये ५१५ विकेट्स आणि ११३ लिस्ट ए सामन्यांमध्ये १५५ विकेट्स घेतल्या होत्या. १९९२ मध्ये न्यूझीलंड विरुद्ध खेळताना त्यांना दुखापत झाली होती, त्यानंतर त्यांची कारकीर्द संपली.

सामन्यादरम्यान डेव्हिस लॉरेन्स यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी इंग्लंडसह भारताच्या खेळाडूंनीही दंडावर काळी पट्टी बांधली. सामन्याबद्दल बोलायचे झाल्यास, तिसऱ्या दिवशी इंग्लंडचा संघ ४६५ धावांवर ऑलआउट झाला. त्यानंतर भारताची फलंदाजी सुरु झाली. सलामीसाठी यशस्वी जैस्वाल आणि केए राहुल ही जोडी उतरली. यशस्वी जैस्वाल फक्त ४ धावा करुन माघारी परतला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: दिल्ली घटनेचे नांदेडमध्ये पडसाद

Bogus Voting Issue: बोगस मतदानाविरोधात 'इंडिया'ची वज्रमूठ, आयोगाविरोधात 300 खासदार रस्त्यावर

Patriotic Films: स्वातंत्र्यदिनी नक्की बघा 'हे' मनात देशभक्ती जागवणारे चित्रपट

Maharashtra Politics : काँग्रेसमध्ये प्रवेश करताच माजी आमदाराच्या अडचणीत वाढ; आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली चौकशी होणार

Rohit Sharma: रोहित शर्माने घेतली ५ कोटींची आलिशान कार; नंबर प्लेट ३०१५ का?

SCROLL FOR NEXT