Ravi Shastri Podcast News Saam Tv News
Sports

धोनी, कोहली अन् सचिनची वार्षिक कमाई किती? आकडा पाहून बसेल धक्का; रवी शास्त्री म्हणाले..

Former Cricketer Ravi Shastri: विराट कोहली, सचिन तेंडुलकर आणि एमएस धोनी हे जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेटपटूंमध्ये आहेत. अलिकडेच रवी शास्त्री यांनी त्यांच्या कमाईबाबत मोठा खुलासा केला आहे.

Bhagyashree Kamble

रवी शास्त्रींनी क्रिकेटर्सच्या कोट्यवधींच्या कमाईचा खुलासा केला.

विराट, सचिन आणि धोनी ब्रँड्समधून १०० कोटींपेक्षा जास्त कमावतात.

एका दिवसात १५-२० जाहिराती करतात, असा दावाही त्यांनी केला.

क्रिकेट हा खेळ भारतामध्ये खूप लोकप्रिय आहे. मात्र, हा खेळ अजूनही संपूर्ण जगभरात तितक्या व्यापक प्रमाणात पोहोचलेला नाही. या खेळामुळे अनेक क्रिकेटर्स स्टार बनले आहेत. सचिन तेंडुलकर, विराट कोहली आणि एमएस धोनी यांसारख्या दिग्गज खेळाडूंनी केवळ मैदानावर नव्हे, तर जाहिरात, प्रोजेक्ट्स आणि गुंतवणुकीतून बक्कळ कमाई केली आहे. दरम्यान, सोशल मीडियात माजी भारतीय खेळाडू आणि प्रशिक्षक रवी शास्त्री यांचा पॉडकास्ट व्हायरल होत आहे. यात त्यांनी क्रिकेटर्सच्या वार्षिक उत्पन्नाबाबत माहिती दिली आहे.

विराट, सचिन आणि धोनीची वार्षिक कमाई किती?

स्टिक टू क्रिकेट या पॉडकास्टवर दिग्गज खेळाडू मायकेल वॉनने रवी शास्त्री यांची मुलाखत घेतली. या पॉडकास्टमध्ये क्रिकेटच्या संदर्भात चर्चा झाली. यात वॉनने रवी शास्त्री यांना, क्रिकेटमध्ये सुपरस्टारचा दर्जा मिळवलेले खेळाडू किती कमावतात? असा प्रश्न उपस्थित केला. यावर शास्त्री यांनी दिलेले उत्तर ऐकून आश्चर्याचा धक्का बसेल.

क्रिकेटर्सच्या कमाईबाबत त्यांनी मोठा खुलासा केला आहे. 'क्रिकेटर्सची कमाई खुप असते. ब्रँड्ससोबत करार केलेल्या प्रोजेक्ट्समधून त्यांची १०० कोटीहून अधिक कमाई होते', असा खुलासा त्यांनी केला आहे. त्यांनी असेही म्हटले की, 'या रकमेचे इंग्रजी रूपांतर १ कोटी पौंडांहून अधिक असू शकते', पॅनलमध्ये उपस्थित असलेल्या एका व्यक्तीनं हे ऐकून थेट "वाह!" अशी प्रतिक्रिया दिली.

जाहिरातीतून बक्कळ कमावतात क्रिकेटर्स

रवी शास्त्री यांनी त्याच पॉडकास्टवर एमएस धोनी, विराट कोहली आणि सचिन तेंडुलकर यांच्या कमाईबाबतही उल्लेख केला. ते म्हणाले, 'एमएस धोनी, विराट कोहली आणि सचिन तेंडुलकर हे एकाच दिवसात १५ ते २० जाहिराती करू शकतात. भारतात इतकं क्रिकेट खेळलं जातं की ब्रँड्सना त्यांच्याशी जोडलेलं राहणं फायदेशीर वाटतं'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Panic Attack Remedies : पॅनिक अटॅक आल्यावर घाबरू नका, पटकन करा 'हा' उपाय

Maharashtra News Live Update: हडपसरमध्ये मुलीची छेड काढणाऱ्याला नागरिकांचा चोप; गांधी चौकात रात्री घडला थरार

Thane : ठाण्यात बिबट्याची दहशत! वागळे इस्टेट परिसरात पाणी पिताना दिसला; व्हिडिओ व्हायरल

Vijay thalapathy: सुपरस्टार ते मुख्यमंत्री! थलापती विजय यांनी घेतली शपथ; वडिलांना अश्रू अनावर, पाहा भावूक व्हिडिओ

Mothers Day Saree Gifts: 'मदर्स डे' निमित्त आईला गिफ्ट द्या सुंदर साड्या, 'या' 10 डिझाईन्स ट्रेडिंगमध्ये

SCROLL FOR NEXT