शामल भंडारे, साम टीव्ही
बिबट्याचा मानवी वस्तीत वावर आता सहज झाला आहे. पुणे आणि नाशिक जिल्ह्यात तर हा प्रश्न गंभीर झाला आहे. पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात एक काळजाचा थरकाप उडवणारी, पण तितकीच अभिमानास्पद घटना समोर आली आहे. इनामगाव येथे अंगणात झोपलेल्या एका वृद्धेवर बिबट्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. पण म्हणतात ना, 'काळ आला होता पण वेळ आली नव्हती'...रात्रीच्या वेळी पुष्पाबाई रंगनाथ नलगे या घरासमोरील अंगणात खाटेवर झोपल्या होत्या. तेव्हा नक्की काय झालं ते आजीच्या तोंडूनच ऐका....
बिबट्या आल्याचं सुनबाई सोनाली आणि नातू सिद्धांतला कळताच दोघेही न घाबरता सामोरे गेले. त्यांच्या जोरदार प्रतिकारामुळेच बिबट्या घाबरला आणि त्याने तेथून धूम ठोकली.अनेकदा कौटुंबिक टीव्ही मालिकांमध्ये सासू आणि सूनेमधील वैर दाखवले जातात. प्रत्यक्ष जीवनातही अनेक घरांमध्ये सासू-सुनेमधील भांडणं नित्याची आहेत.
मात्र नलगे कुटुंबातील पुष्पाबाईंवर सुनबाई सोनालीची मोठी माया आहे. त्यामुळेच समोर बिबट्या असूनही सून आणि लहानग्या नातवाने जीवाची पर्वा न करता दाखवलेले धाडस नक्कीच कौतुकाचे आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.