ind vs eng test series saam tv news
Sports

IND vs ENG Test Series: भारत- इंग्लंड कसोटी मालिकेत कोण मारणार बाजी ?दिग्गज खेळाडूची मोठी भविष्यवाणी

IND vs ENG Test Series Winner Prediction: भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये कोण बाजी मारणार? याबाबत बोलताना माजी क्रिकेटपटूने मोठी भविष्यवाणी केली आहे.

Ankush Dhavre

Ian Chappell Prediction For IND vs ENG Test Series:

ऑस्ट्रेलियाचा दिग्गज खेळाडू इयान चॅपलने भारत- इ्ंग्लंड कसोटी मालिकेबाबत मोठी भविष्यवाणी केली आहे. या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका रंगणार आहे. मालिकेतील पहिल्या कसोटीत भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता.

तर मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाने दमदार कमबॅक करत १०६ धावांनी विजय मिळवला होता. सध्या ही मालिका १-१ च्या बरोबरीत आहे. त्यामुळे दोन्ही संघांना मालिकेत आघाडी घेण्याची संधी असणार आहे. दरम्यान इयान चॅपलचं म्हणणं आहे की, येणाऱ्या सामन्यांमध्ये इंग्लंडचा संघ भारतीय संघाला टक्कर देऊ शकतो.

भारत- इंग्लंड कसोटी मालिकेत कोण मारणार बाजी?

इयान चॅपलने ईएसपीएन क्रिकइन्फोच्या कॉलममध्ये लिहीले की, ‘बेन स्टोक्सच्या आक्रमक नेतृ्त्वाखाली खेळणारा संघ हा जो रुटच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या संघापेक्षा कितीतरी पटाने उत्तम आहे. गेल्यावेळी जेव्हा इंग्लंडचा संघ भारत दौऱ्यावर आला होता त्यावेळी इंग्लंडच्या फलंदाजांनी फिरकी गोलंदाजांसमोर लोटांगण घातलं होतं. २०२१ मध्ये झालेल्या कसोटी मालिकेत इंग्लंडने पहिल्या कसोटीत विजय मिळवला मात्र त्यानंतर मालिका गमावली. स्टार फलंदाज विराट कोहली मालिकेतून बाहेर असणार आहे. तर केएल राहुल आणि रविंद्र जडेजाचं कमबॅक होणार आहे.’

तसेच त्यांनी पुढे लिहीले की, ‘भारतीय संघ मजबूत संघ आहे. त्यांच्याकडे रोहित शर्मासारखा उत्तम कर्णधार आहे. रविंद्र जडेजा आणि केएल राहुल देखील दुखापतीतून सावरुन कमबॅक करणार आहे त्यामुळे भारतीय संघ आणखी मजबूत होणार आहे. मात्र कोहली उर्वरीत सामन्यांमध्ये खेळणार नाहीये हा भारतीय संघासाठी मोठा धक्का आहे. आशा करतो की, निवडकर्ते श्रेयस अय्यरच्या फलंदाजी क्षमतेला अधिक महत्व देणं बंद करतील आणि कुलदीप यादवच्या विकेट घेण्याच्या क्षमतेला अधिक महत्व देतील.’ (Cricket news in marathi)

तसेच त्यांनी पुढे लिहीले की, ‘भारत आणि इंग्लंड कसोटी मालिका अपेक्षेप्रमाणेच होत आहे. दोन दिग्गज संघांमध्ये ५ कसोटी सामने..’ या मालिकेतील तिसरा कसोटी सामना राजकोटमध्ये रंगणार आहे. सध्या १-१ ने बरोबरीत असलेल्या मालिकेत दोन्ही संघ विजयी आघाडी घेण्याच्या प्रयत्नात असणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhaskargad : मित्रांसोबत नाशिकला गेलाय? 'भास्करगड'ची आवर्जून सफर करा

Maharashtra Live News Update: पोहण्यासाठी गेलेल्या 20 वर्षीच्या तरुणाचा तलावात बुडून मृत्यू,नागपूरमधील घटना

Gautam Gambhir : टीम इंडियाची अवस्था 'गंभीर'; जबाबदार कोण? आकडेवारी चिंता वाढवणारी

Grah Gochar 2025: चंद्र, मंगळ आणि केतूच्या भेटीनं ३ राशींचे भाग्य उजळणार, नात्यात गोडवा अन् घरात येणार पैसा

Palak Curry Recipe : पालक करी अन् गरमागरम चपाती, रविवारचा हेल्दी बेत

SCROLL FOR NEXT