former australian bowler brett lee predicts the winner of ipl 2024 cricket news marathi  twitter
Sports

IPL 2024 Winner Prediction: यंदा हाच संघ उंचावणार IPL ची ट्रॉफी! पहिल्या सामन्यापूर्वीच ब्रेट लीची मोठी भविष्यवाणी

Brett Lee IPL Winner Prediction: आयपीएल २०२४ स्पर्धेला आजपासून प्रारंभ होणार आहे. स्पर्धेतील पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू हे दोन्ही संघ आमने सामने येणार आहेत.

Ankush Dhavre

Brett Lee Winner Prediction Of IPL 2024:

आयपीएल २०२४ स्पर्धेला आजपासून प्रारंभ होणार आहे. स्पर्धेतील पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू हे दोन्ही संघ आमने सामने येणार आहेत. यंदाही आयपीएलच्या एका ट्रॉफीसाठी १० संघ कडवी झुंज देताना दिसून येणार आहेत. या स्पर्धेला सुरुवात होण्यापूर्वी कोणता संघ जेतेपद पटकावणार याबाबत अंदाज व्यक्त केला जात आहे. दरम्यान ऑस्ट्रेलियाचा माजी गोलंदाज ब्रेट लीने देखील आयपीएल २०२४ स्पर्धेच्या विजेत्याबद्दल मोठा खुलासा केला आहे.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू हा स्टार खेळाडूंनी सजलेला संघ आहे. दरवर्षी या संघात एकापेक्षा एक स्टार विस्फोटक फलंदाज असतात. मात्र असं असतानाही या संघाला गेल्या १६ हंगामात एकही जेतेपद पटकावता आलेलं नाही. यावर्षी फाफ डू प्लेसिस संघाचं नेतृत्व करताना दिसून येणार आहे. दरम्यान ब्रेट लीने भाकीत केलंय की, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ आगामी हंगामात आयपीएलची ट्रॉफी उंचावणार.

विराट कोहली, फाफ डू प्लेसिस आणि ग्लेन मॅक्सवेलसारखे अनुभवी खेळाडू असलेल्या संघाला गेल्या हंगामात १४ पैकी ७ सामने जिंकता आले होते. यंदाच्या हंगामात कोणता संघ जेतेपदासाठी प्रबळ दावेदार आहे असं विचारलं असता, ब्रेट लीने क्षणाचाही विलंब न करता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचं नाव घेतलं आहे. (Cricket news in marathi)

आयपीएल २०२४ स्पर्धेसाठी असा आहे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ..

फाफ डू प्लेसीस, विराट कोहली, गेन मॅक्लवेल, पाटीदार, रावत, कार्तिक, सिराज, ग्रीन, जॅक्स, प्रभुदेसाई, लोमरोर, कर्ण शर्मा, टोप्ली, भंडगे, मयंक डागर, व्यशाख, आकाश दीप, हिमांशु, राजन कुमार, अल्झारी, यश दयाल, टॉम करन, फर्ग्युसन, स्वप्निल सिंह, सौरव चौहान.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

हिंगोलीत अनंत चतुर्दशीचा जल्लोष; चिंतामणी गणपतीच्या दर्शनासाठी लाखो महिला भाविकांची उपस्थिती|VIDEO

Maratha-OBC Quota Row: ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंविरोधात पोलिसात तक्रार दाखल; काय आहे कारण?

Chandra Grahan Tips : ग्रहणाच्या वेळी अन्न दूषित होऊ नये यासाठी सोपा उपाय

Anant Chaturdashi 2025 live updates : श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मिरवणूक रथात विराजमान

Viral Video: शाळा आहे की मसाज पार्लर! शिक्षकाने विद्यार्थिनींकडून करून घेतली बॉडी मसाज, VIDEO पाहून तुम्हालाही येईल राग

SCROLL FOR NEXT