IPL Controvesies: कोणी भिडलं, कोणी नडलं! पाहा IPL स्पर्धेत गाजलेले वाद

Controvesies In IPL History: या स्पर्धेची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. दरम्यान या स्पर्धेत काही वाद देखील झाले आहेत. जाणून घ्या २००८ पासून ते २०२३ पर्यंत सर्व वादांची माहिती एकाच क्लिकवर.
harbhajan singh slapped s sreesanth to virat kohli naveen ul haq verbal fight know the IPL Controvesies from 2008 to 2023 season
harbhajan singh slapped s sreesanth to virat kohli naveen ul haq verbal fight know the IPL Controvesies from 2008 to 2023 season twitter
Published On

IPL Controvesies News:

आयपीएल २०२४ स्पर्धा सुरू व्हायला अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या सामन्याने या स्पर्धेची सुरुवात होणार आहे. या स्पर्धेत जगातील दिग्गज खेळाडू सहभाग घेत असताना. त्यामुळे या स्पर्धेत रेकोर्ड्सचा पाऊस पडतो. या स्पर्धेची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. दरम्यान या स्पर्धेत काही वाद देखील झाले आहेत. जाणून घ्या २००८ पासून ते २०२३ पर्यंत सर्व वादांची माहिती एकाच क्लिकवर.

आयपीएल २००८

आयपीएलच्या पहिल्याच हंगामात गाजलेला वाद म्हणजे श्रीसंथ आणि हरभजन सिंग यांच्यातील वाद. त्यावेळी हरभजन सिंग मुंबई इंडियन्स संघाकडून खेळत होता. तर श्रीसंथ पंजाबमध्ये होता. त्यावेळी हरभजन सिंगने श्रीसंथच्या कानाखाली वाजवली होती.

आयपीएल २००९

आयपीएलच्या सुरुवातीच्या हंगामांमध्ये पाकिस्तानी खेळाडूंनाही खेळण्याची अनुमती दिली गेली होती. २००९ मध्ये झालेल्या हंगामात पाकिस्तानचा गोलंदाज मोहम्मद आसिफ डोप टेस्टमध्ये फेल झाला होता. त्यामुळे त्याच्यावर बंदी घालण्यात आली होती.

आयपीएल २०१०

राजस्थान रॉयल्सकडून खेळत असताना रविंद्र जडेजाने आपला कॉन्ट्रॅक्ट रिन्यू केला नव्हता. त्यामुळे त्याच्यावर बंदी घालण्यात आली होती

आयपीएल २०११

मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंवर आरोप करणाऱ्या गॅब्रियेला या चीयरलीडरला मुंबईच्या ताफ्यातून बाहेर करण्यात आलं होतं. (Cricket news in marathi)

harbhajan singh slapped s sreesanth to virat kohli naveen ul haq verbal fight know the IPL Controvesies from 2008 to 2023 season
IPL 2024 Complete Schedule: आजपासून क्रिकेटच्या उत्सवाला सुरुवात! इथे पाहा IPL स्पर्धेचं संपूर्ण वेळापत्रक

आयपीएल २००८

आयपीएलच्या पहिल्याच हंगामात गाजलेला वाद म्हणजे श्रीसंथ आणि हरभजन सिंग यांच्यातील वाद. त्यावेळी हरभजन सिंग मुंबई इंडियन्स संघाकडून खेळत होता. तर श्रीसंथ पंजाबमध्ये होता. त्यावेळी हरभजन सिंगने श्रीसंथच्या कानाखाली वाजवली होती.

आयपीएल २००९

आयपीएलच्या सुरुवातीच्या हंगामांमध्ये पाकिस्तानी खेळाडूंनाही खेळण्याची अनुमती दिली गेली होती. २००९ मध्ये झालेल्या हंगामात पाकिस्तानचा गोलंदाज मोहम्मद आसिफ डोप टेस्टमध्ये फेल झाला होता. त्यामुळे त्याच्यावर बंदी घालण्यात आली होती.

आयपीएल २०१०

राजस्थान रॉयल्सकडून खेळत असताना रविंद्र जडेजाने आपला कॉन्ट्रॅक्ट रिन्यू केला नव्हता. त्यामुळे त्याच्यावर बंदी घालण्यात आली होती

आयपीएल २०११

मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंवर आरोप करणाऱ्या गॅब्रियेला या चीयरलीडरला मुंबईच्या ताफ्यातून बाहेर करण्यात आलं होतं.

आयपीएल २०१२

शाहरुख खानवर वानखेडे स्टेडियममध्ये येण्यावर बंदी घालण्यात आली होती. त्याने सुरक्षारक्षकांसोबत वाद केला होता

आयपीएल २०१३

राजस्थान रॉयल्स संघातील श्रीसंथ, अजित चंडेला आणि अंकित चव्हाण यांना स्पॉट फिक्सिंग प्रकरणात दिल्ली पोलिसांनी अटक केली होती

आयपीएल २०१४

प्रीती झिंटाने नेस वाडियाविरोधात तक्रार केली होती. वानखेडे स्टेडियमवर तिच्यावर गैरवर्तणूक करण्यात आली असे आरोप तिने केले होते.

आयपीएल २०१५

आयपीएल २०१५ मध्ये विराट कोहलीने bcci चा नियम मोडून काढला होता

आयपीएल २०१६

या हंगामात उच्च न्यायालयाने मुंबई आणि पुणे येथे होणारे बाहेर खेळण्यात यावे असे सांगितले होते. कारण महाराष्ट्रात पाणी कपात करण्यात आली होती.

आयपीएल २०१७

या स्पर्धेत समालोचन करत असलेल्या संजय मांजरेकरने कायरन पोलार्डला ब्रेनलेस म्हटले होते. त्यानंतर पोलार्डनेही जोरदार प्रत्युत्तर दिले होते.

harbhajan singh slapped s sreesanth to virat kohli naveen ul haq verbal fight know the IPL Controvesies from 2008 to 2023 season
Virat kohli Record: पहिल्याच सामन्यात विराटला इतिहास रचण्याची संधी! १ धाव करताच मोडणार IPL स्पर्धेतील मोठा रेकॉर्ड

आयपीएल २०१८

आयपीएल २०१८ मध्ये चेन्नईने सामना होस्ट करण्याचे हक्क गमावले होते.

आयपीएल २०१९

या हंगामात आर अश्विनने राजस्थानचा कर्णधार जोस बटलरला मानकड करून बाद केलं होतं.

आयपीएल २०२०

युएईमध्ये झालेल्या या हंगामात सुरेश रैना सामन्यापूर्वीच वैयक्तिक कारणास्तव माघारी परतला होता.

आयपीएल २०२१

या हंगामात csk vs dc यांच्यातील सामन्यात ऑन फील्ड अंपायरने नो चेंडू दिला होता. मात्र त्यानंतर थर्ड अंपायरने निर्णय बदलून हा निर्णय वाईड दिला. त्यावेळी एमएस धोनी मैदानावर आला होता.

आयपीएल २०२२

या हंगामात दिल्लीचा कर्णधार रिषभ पंत आणि राजस्थानचा कर्णधार जोस बटलर या दोघांमध्ये वाद झाला होता.

आयपीएल २०२३

या हंगामात विराट कोहली आणि नवीन उल हक यांच्यात जोरदार वाजलं होतं. त्यानंतर या वादात गंभीरने देखील उडी घेतली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com