Sports

MI vs GT Turning Points: सूर्याची फटकेबाजी ते मधवालची भन्नाट गोलंदाजी, 'हे' आहेत मुंबईच्या विजयाचे ५ टर्निंग पॉईंट्स

Mumbai Indians Turning Points: जाणून घ्या या सामन्यातील ५ टर्निंग पॉईंट्स.

Ankush Dhavre

MI vs GT,IPL 2023: शुक्रवारी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स या दोन्ही संघांमध्ये रोमांचक सामना पाहायला मिळाला. या सामन्यात मुंबई इंडियन्स संघातील फलंदाजांनी आणि गोलंदाजांनी जोरदार कामगिरी करत अहमदाबादच्या मैदानावर झालेल्या पराभवाचा बदला घेतला आहे.

या सामन्यात मुंबई इंडियन्स संघाने प्रथम फलंदाजी करताना २१८ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना गुजरातला १९१ धावा करता आल्या.

या सामन्यात मुंबई इंडियन्स संघाने जोरदार कामगिरी करत २७ धावांनी विजय मिळवला आहे. दरम्यान जाणून घ्या या सामन्यातील ५ टर्निंग पॉईंट्स.

१) ईशान - रोहितने करून दिली चांगली सुरुवात :

प्रथम फलंदाजी करत असलेल्या मुंबई इंडियन्स संघाला रोहित शर्मा आणि ईशान किशनने जोरदार सुरुवात करून दिली. दोन्ही फलंदाजांनी मिळून पावरप्लेच्या षटकांमध्ये तुफान फटकेबाजी केली. या डावात रोहित शर्माने २९ धावांची खेळी केली. तर ईशान किशनने ३१ धावांची खेळी केली. दोघांनी मिळून ६१ धावांची भागीदारी केली. या भागीदारीमुळे भारतीय संघाला चांगली सुरुवात मिळाली होती.

२) सूर्यकुमार यादवची तुफानी खेळी:

रोहित शर्मा बाद झाल्यानंतर फलंदाजीला आलेल्या सूर्यकुमार यादवने संथ गतीने सुरुवात केली. मात्र त्यानंतर त्याने गियर टाकला आणि तुफान फटकेबाजी करायला सुरुवात केली. त्याने ३२ चेंडूंमध्ये आपले अर्धशतक पूर्ण केले. त्यांनतर अवघ्या १७ चेंडूंमध्ये त्याने पुढील ५० धावा करत जोरदार शतक झळकावले. त्याने अल्झारी जोसेफ. मोहम्मद शमी आणि मोहित शर्माच्या गोलंदाजीवर धावांचा पाऊस पाडला. त्याने २० व्या षटकातील शेवटच्या चेंडूवर षटकार मारला आणि आपल्या आयपीएल कारकिर्दीतील पहिले शतक झळकावले. (Latest sports updates)

३) विष्णू विनोद आणि सूर्यकुमार यादवची भागीदारी :

या सामन्यात एकवेळ अशी देखील आली होती जेव्हा मुंबईची धावसंख्या ३ गडी बाद ८८ इतकी होती. त्यावेळी विष्णू विनोद आणि सूर्यकुमार यादवने महत्वपूर्ण भागीदारी केली आणि संघाची धावसंख्या पुढे नेली. दोघांनी मिळून ६५ धावांची भागीदारी केली. या डावात विष्णू विनोदने २ चौकार आणि २ षटकारांच्या साहाय्याने ३० धावांची खेळी केली.

४) आकाश मधवालची गोलंदाजी:

इम्पॅक्ट प्लेअर ,म्हणून गोलंदाजी कारण्यासाठी आलेल्या आकाश मधवालने या डावात अप्रतिम गोलंदाजी केली. त्याने जोरदार फॉर्ममध्ये असलेल्या वृद्धिमान साहाला पायचीत तर शुभमन गिलला त्रिफळाचित करत माघारी धाडले. त्यानंतर त्याने आक्रमक फलंदाजी करत असलेल्या डेव्हिड मिलरला पॅव्हेलियनची वाट दाखवली. या डावात त्याने ४ षटकांमध्ये ३१ धावा खर्च करत ३ गडी बाद केले.

५) गुजरातची खराब सुरुवात:

गुजरातला हा सामना जिंकण्यासाठी २१८ धावांची गरज होती. या धावांचा पाठलाग करताना आक्रमक सुरुवात केली. मात्र फलंदाजांना विकेट सांभाळून फलंदाजी करता आली नाही. अवघ्या ५५ धावांवर गुजरातचे ५ फलंदाज माघारी परतले होते. इतक्या लवकर विकेट्स गमावल्यामुळे गुजरातला हा सामना गमवावा लागला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : विजेचा धक्का लागून शेतकऱ्यासह दोन बैलांचा मृत्यू

Dhule Corporation School : महापालिकेच्या ६५ पैकी तब्बल ४५ मराठी शाळा बंद; धुळे शहरातील धक्कादायक वास्तव

Fashion Inspired By GenZ Actress: नव्या ट्रेंडसाठी या जेन झी अभिनेत्रींची फॅशन टिप्स करा फॉलो

Kapil Sharma Cafe: कपिल शर्माच्या ज्या कॅफेवर गोळीबार झाला तो 'कॅप्स कॅफे' कुठे आहे?

अजित पवारांवर बोलताना लक्ष्मण हाकेंची जीभ घसरली, म्हणाले- ते महाजातीयवादी...VIDEO

SCROLL FOR NEXT