Border-Gavaskar Trophy: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये ४ कसोटी सामन्यांची मालिका ९ फेब्रुवारी पासून सुरु होणार आहे. ही मालिका भारतीय संघासाठी अतिशय महत्वाची असणार आहे. कारण ही मालिका जिंकून भारतीय संघ थेट वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत प्रवेश करणार आहे.
तर दुसरीकडे ऑस्ट्रेलिया संघाला भारतीय संघाला भारतात येऊन पराभूत करण्याच्या प्रयत्नात असणार आहे. गेल्या १८ वर्षांपासून ऑस्ट्रेलिया संघ भारतीय संघाला मायदेशात हरवू शकला नाहीये. त्यामुळे यावेळी ऑस्ट्रेलिया संघ देखील भारतीय संघाला पराभूत करण्यासाठी पूर्ण जोर लावणार आहे. दरम्यान ऑस्ट्रेलिया संघातील ५ असे खेळाडू आहेत, जे भारतीय संघाला विजय मिळवण्यापासून रोखू शकतात. (Latest Sports Update)
डेव्हिड वॉर्नर: ऑस्ट्रेलिया संघातील अनुभवी फलंदाज डेव्हिड वॉर्नरला भारतात खेळण्याचा दांडगा अनुभव आहे. गेल्या काही वर्षांपासून तो ऑस्ट्रेलिया संघासाठी मोलाची भूमिका बजावतोय. भारतीय गोलंदाजांसमोर डेव्हिड वॉर्नरला कमी धावांवर बाद करण्याचं आव्हान असणार आहे. त्याने आतापर्यंत भारतात खेळताना एकूण १८ कसोटी सामन्यांमध्ये ११४८ धावा केल्या आहेत.
स्टीव्ह स्मिथ : भारतीय संघाला जर या मालिकेत विजय मिळवायचा असेल तर स्टीव्ह स्मिथला लवकरात लवकर बाद करणं गरजेचं आहे. कारण वर्तमान ऑस्ट्रेलिया संघात स्टीव्ह स्मिथ हा एकमेव फलंदाज आहे ज्याने भारतीय संघाविरुद्ध खेळताना सर्वाधिक धावा केल्या आहेत. त्याने आतापर्यंत खेळलेल्या एकूण १४ कसोटी सामन्यांमध्ये १७४२ धावा केल्या आहेत.
मिचेल स्टार्क: ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क याने अनेकदा भारतीय संघाला आपल्या धारदार गोलंदाजीने अडचणीत टाकले आहे. भारतीय संघाविरुध्द्व खेळताना त्याने ४२ कसोटी सामन्यांमध्ये ४२ गडी बाद केले आहेत. मात्र भारतात खेळताना त्याला ४ कसोटी सामन्यांमध्ये केवळ ७ गडी बाद करण्यात यश आले आहे.(Team India)
नॅथन लायन : ऑस्ट्रेलियाचा सर्वात अनुभवी फिरकी गोलंदाज नॅथन लायन हा भारतीय खेळपट्टीवर ऑस्ट्रेलिया संघासाठी हुकमी एक्का ठरू शकतो. भारतीय खेळपट्टी ही फिरकी गोलंदाजांची नेहमीच फायदेशीर ठरते. भारतात त्याने ४ कसोटी सामन्यांमध्ये तब्बल ३४ गडी बाद केले आहेत.
पॅट कमिन्स: ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स हा कसोटी क्रिकेटमध्ये अव्वल स्थानी असलेला गोलंदाज आहे. त्यामुळे भारतीय संघाला पॅट कमिन्स पासून जरा सावध राहावं लागणार आहे. त्याने भारतात खेळताना २ कसोटी सामन्यांमध्ये ८ गडी बाद केले आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.