FIFA World Cup,  Shah Rukh Khan
FIFA World Cup, Shah Rukh Khan SAAM TV
क्रीडा | IPL

ARG vs FRA : मेस्सीच्या अर्जेंटिनानं FIFA World Cup जिंकला; शाहरूखला आली आईची आठवण, म्हणाला...

Nandkumar Joshi

FIFA World Cup, ARG vs FRA : कतारच्या भूमीत फीफा वर्ल्डकप २०२२ चा अंतिम सामना अर्जेंटिना आणि फ्रान्स यांच्यात रंगला. विश्वविजेतेपदासाठी झालेल्या या रोमहर्षक लढतीत अर्जेंटिनानं पेनेल्टी शूटआउटमध्ये गोल डागून जेतेपदावर नाव कोरलं.

मेस्सीच्या अर्जेंटिनानं जेतेपद पटकावल्यानंतर बॉलिवूडचा किंग खान शाहरूखनं ट्विट करून आपली पहिली प्रतिक्रिया दिली. त्यानं खासकरून लियोनल मेस्सीचे आभार मानले.

अर्जेंटिना विरुद्ध फ्रान्स यांच्यातील अंतिम सामना क्षणाक्षणाला उत्कंठा शिगेला पोहचवणारा ठरला. श्वास रोखून धरायला लावणाऱ्या या लढतीत अर्जेंटिनानं अखेर बाजी मारली. पेनल्टी शूटआउटमध्ये गोलपोस्टमध्ये गोल डागून विश्वविजेतेपदाला गवसणी घातली. ९० मिनिटांचा खेळ झाल्यानंतर २-२ असे गुण होते. अधिकच्या ३० मिनिटांच्या खेळात गुण ३-३ झाले. त्यानंतर पेनेल्टी शूटआउटमध्ये या रोमहर्षक लढतीला निकाल लागला. या सामन्यात अनेक चढ-उतार बघायला मिळाले. पहिला हाफ डाव अर्जेंटिनाच्या नावे राहिला. त्यानंतर दुसऱ्या हाफमध्ये एम्बाप्पेने दोन मिनिटांच्या फरकात दोन गोल डागून सामना बरोबरीत आणला. अखेर मेस्सीच्या संघानं पेनेल्टी शूटआउटमध्ये बाजी मारली. (FIFA World Cup 2022)

अर्जेंटिनानं ३६ वर्षांचा दुष्काळ संपवत विश्वविजेतेपदाला गवसणी घातली. हा रोमहर्षक सामना याचि देही...बघताना फुटबॉलप्रेमींची उत्कंठा क्षणाक्षणाला वाढत होती. श्वास रोखून धरायला लावणारा असा हा सामना होता. याचा साक्षीदार बॉलिवूडचा किंग खान शाहरूखही होता. या सामन्यानंतर शाहरूख खाननं खास प्रतिक्रिया दिली आहे. त्यानं ट्विट करून विशेषतः मेस्सीचे आभार मानले. (Lionel Messi)

माझ्या आईसोबत एका छोट्याशा टीव्हीवर वर्ल्डकप स्पर्धा बघितल्याचं आठवतं. तोच उत्साह आता माझ्या मुलांसोबत बघताना आहे. आम्हाला सर्वांना प्रतिभा, कठोर मेहनत आणि स्वप्नांवर विश्वास ठेवायला लावल्याबद्दल खासकरून मेस्सीचे आभार!, असं शाहरूख खान यानं ट्विटमध्ये म्हटलं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

RCB vs CSK IPL 2024 : बेंगळुरूची प्लेऑफमध्ये एन्ट्री पक्की; चेन्नई आयपीएलमधून बाहेर

Indian Politics 2024 : भाजप झाला मोठा संघ झाला छोटा;'आधी RSS ची गरज, आता भाजप सक्षम'

Crime News: युट्यूब पाहून छापल्या लाखोंच्या बनावट नोटा; 9 वी पास तरुणाचा कारनामा

Maharashtra Politics: 'नावं द्या त्या पोलिसांना बघतो मी', उद्धव ठाकरेंनी भरला पोलिसांना दम; मुलुंडच्या राड्यावरून ठाकरेंचा संताप

Kalyan Crime News : यूपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणीवर ज्वलनशील पदार्थ लुटलं, कल्याणमधील घटनेने खळबळ

SCROLL FOR NEXT