ARG vs FRA : मेस्सी जैसा कोई नहीं... फायनलमध्ये गोल डागताच विक्रमाला गवसणी

FIFA World Cup : फ्रान्सविरुद्ध फायनलमध्ये गोल डागताच मेस्सीनं खास रेकॉर्ड केला.
Lionel Messi/@FIFAWorldCup/Twitter
Lionel Messi/@FIFAWorldCup/TwitterSAAM TV
Published On

FIFA World Cup, ARG vs FRA : अर्जेंटिनाच्या लियोनल मेस्सीची जगातल्या महान फुटबॉलपटूंमध्ये गणना होते. या खेळाडूचं नाव त्यांच्यात देशाचे म्हणजेच अर्जेंटिनाच्या डिएगो माराडोना आणि ब्राझीलच्या पेले या महान फुटबॉलपटूंच्या बरोबरीनं घेतलं जातं.

मेस्सी रविवारी फ्रान्सच्या विरुद्ध फीफा वर्ल्डकप २०२२ च्या अंतिम लढतीत मैदानात उतरला आणि त्यानं पेलेंच्या विक्रमाशी बरोबरी साधली. (FIFA World Cup 2022)

Lionel Messi/@FIFAWorldCup/Twitter
Argentina Win FIFA WC 2022: अर्जेंटिनाचा ३६ वर्षांचा दुष्काळ संपला! मेस्सीचं स्वप्न पूर्ण, फ्रान्सची कडवी झुंज

मेस्सीनं २३ व्या मिनिटालाच पेनल्टीला गोलमध्ये रुपांतरित करून अर्जेंटिनाला एका गोल फरकानं आघाडीवर नेलं. या गोलसोबतच मेस्सीनं वर्ल्डकप स्पर्धेत सर्वाधिक गोल डागणाऱ्या पेलेंच्या विक्रमाची बरोबरी केली.

Lionel Messi/@FIFAWorldCup/Twitter
Lionel Messi/@FIFAWorldCup/TwitterSAAM TV
Lionel Messi/@FIFAWorldCup/Twitter
FIFA WC Final: सामान्य कुटूंबातील 'हे' पाच खेळाडू बनले फुटबॉल स्टार, असा होता स्ट्रगलर ते स्टार होण्याचा संघर्षमय प्रवास

पेलेच्या नावे फीफा वर्ल्डकप स्पर्धेत १२ गोल आहेत. मेस्सीने पेनल्टीला गोलमध्ये रुपांतरित करून वर्ल्डकप स्पर्धेत सर्वाधिक १२ गोल करणाऱ्या पेलेंच्या विक्रमाशी बरोबरी केली. (Lionel Messi)

Lionel Messi/@FIFAWorldCup/Twitter
Lionel Messi/@FIFAWorldCup/TwitterSAAM TV

या वर्ल्डकपमध्ये १२ गोलसह मेस्सीने आठ गोल डागण्यात आपल्या संघसहकाऱ्यांना मदतही केली. अशा पद्धतीने त्याने एकूण २० गोल करण्यात आपला मोलाचा वाटा उचलला. जे १९६६ पासून कोणत्याही एका खेळाडूनं दिलेलं हे सर्वात मोठं योगदान आहे.

Lionel Messi/@FIFAWorldCup/Twitter
Lionel Messi/@FIFAWorldCup/TwitterSAAM TV

फीफा वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक गोल डागण्याचा विक्रम जर्मनीच्या मिरोस्लाव्ह क्लोजच्या नावावर आहे. त्याने २४ सामन्यांत १६ गोल केले होते. त्यानंतर ब्राझीलच्या रोनाल्डोचा क्रमांक लागतो. त्याने १९ सामन्यांत १५ गोल केले आहेत.

Lionel Messi/@FIFAWorldCup/Twitter
Lionel Messi/@FIFAWorldCup/TwitterSAAM TV

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com