Fifa World Cup 2022 : Saam Tv
Sports

Argentina Win FIFA WC 2022: अर्जेंटिनाचा ३६ वर्षांचा दुष्काळ संपला! मेस्सीचं स्वप्न पूर्ण, फ्रान्सची कडवी झुंज

फिफा वर्ल्ड कपचा ब्लॉकबस्टर अंतिम सामना फ्रान्स आणि अर्जेंटिना यांच्यात लुसेल स्टेडियम झाला. फ्रान्स आणि अर्जेंटिना या दोन्ही तगड्या संघाच्या खेळाडूंनी जोरदार खेळ दाखवला.

Vishal Gangurde

Fifa World Cup 2022 : फिफा वर्ल्ड कपचा ब्लॉकबस्टर अंतिम सामना फ्रान्स आणि अर्जेंटिना यांच्यात लुसेल स्टेडियम झाला. फ्रान्स आणि अर्जेंटिना या दोन्ही तगड्या संघाच्या खेळाडूंनी जोरदार खेळ दाखवला. मात्र, मेस्सीच्या अर्जेंटिनाने चार पावले पुढे टाकत फ्रान्सला धूळ चारली. हा रंगतदार फिफा वर्ल्ड कप २०२२चा अंतिम सामना जिंकत अर्जेंटिनाने मोठा इतिहास रचला आहे. (Latest Marathi News)

फिफा वर्ल्ड कप २०२२ चा अंतिम सामना रविवारी फ्रान्स आणि अर्जेंटिना या दोन्ही बलाढ्य संघात झाला. या अंतिम सामन्यात अर्जेंटिनाने गतविजेत्या फ्रान्सवर पेनाल्टी शुटआऊटमध्ये ४-२ च्या गोल फरकाने विजय मिळवला. मेस्सीच्या अर्जेंटिनाने तब्बल ३६ वर्षांनंतर फिफा फुटबॉल विश्वचषक जिंकला आहे. अर्जेंटिना आतापर्यंत तीन वेळा विश्वचषकावर नाव कोरलं आहे. अर्जेंटिनाने याआधी १९७८ आणि १९८६ साली फिफा विश्वचषक जिंकला होता.

मेस्सीच्या अर्जेंटिनाने विश्वचषकाचा अंतिम सामना कसा जिंकला?

संपूर्ण सामन्यात अर्जेंटिनाने वर्चस्व राखलं होतं. अर्जेंटिनाने सुरुवातीपासूनच आक्रमण करत खेळण्यास सुरूवात केली. सामन्याच्या २३ मिनिटालाच अर्जेंटिनाने पेनाल्टी मिळाली. त्यानंतर लिओनल मेस्सीने आपल्या संघाचे गोलचे खाते उघडले.

लिओनल मेस्सीने आपला खेळ तसाच सुरू ठेवला. त्यानंतर ३६ व्या मिनिटाला एंजेल डी मारियाने अर्जेंटिनासाठी दुसरा गोल नोंदवला. त्यानंतर ही आघाडी अर्जेंटिनाने पहिला हाफ संपेपर्यंत कायम ठेवली होती.

दुसऱ्या हाफमध्येही अर्जेंटिनाने फ्रान्सला गोलसाठी संघर्ष करायला लावला. मात्र, दुसऱ्या हाफच्या अखेरीस ८० व्या मिनिटाला एमबाप्पेने पेनल्टीवर गोल करत फ्रान्सचे खाते उघडले. त्यानंतर पुन्हा दुसऱ्या मिनिटालाच एमबाप्पेने फ्रान्ससाठी दुसरा गोल केला आणि बरोबरी साधून दिली.

९० मिनिटाच्या खेळानंतर ८ मिनिटांचा भरपाई वेळ देण्यात आला. या वेळेत एमबाप्पेला गोल करण्याची संधी मिळाली नाही. त्यानंतर ज्यादा वेळेत सामना खेळवण्यात आला. या ज्यादा वेळेच्या पहिल्या हाफमध्ये अर्जेंटिनाला गोल करण्याची संधी मिळाली होती. मात्र, फ्रान्सच्या चांगल्या बचावामुळे अर्जेंटिना करू शकली नाही. अखेर ज्यादा वेळेच्या दुसऱ्या हाफमध्ये अर्जेंटिनाकडून मेस्सीने गोल करत ३-२ ने अर्जेंटिनाला आघाडी मिळवून दिली.

११७ व्या मिनिटाला फ्रान्सला पेनल्टी मिळाली. एमबाप्पेने वैयक्तिक आणि संघासाठी तिसरा गोल केला. त्यानंतर ज्यादावेळ संपेपर्यंत ३-३ अशीच बरोबरी राहिली. त्यामुळे सामना पेनल्टीशुट आऊटमध्ये गेला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jalgaon Crime: जुना वाद नव्यानं पेटला; धारदार शस्त्राने वार करत एकाचा जीव घेतला

Pune Crime : पुण्यात अल्पवयीन मुलांचा हैदोस; टोळक्याने ७ ते ८ गाड्या फोडल्या, VIDEO

Ind vs Eng : भारत विरुद्ध इंग्लंडचा चौथा कसोटी सामना ड्रॉ; जडेजा अन् वॉशिंग्टनच्या दमदार खेळीने गड राखला

Pune Rave Party : रेव्ह पार्टीत खडसेंचे जावई! खडसेंचा आवाज दाबण्यासाठी बनाव? रेव्ह पार्टीत नेमकं काय घडलं?

Kalyan News : मोठी बातमी! कल्याणमध्ये भर पावसात ५ ते ६ घरे कोसळली, परिसरात खळबळ

SCROLL FOR NEXT