FIFA WC Final: विश्वविजेते होऊनही मिळणार डुप्लिकेट ट्रॉफी; खरी ट्रॉफी न मिळण्याचं कारण काय?

आजच्या अंतिम सामन्यातही विजेत्या संघाला खरी ट्रॉफी फक्त सेलिब्रेशन करण्यासाठीच मिळणार आहे.
Fifa World Cup 2026, America, Mexico, Canada
Fifa World Cup 2026, America, Mexico, Canadasaam tv
Published On

FIFA WC Final: कतारमध्ये रंगणारा फिफा विश्वचषकाचा अंतिम सामना अवघ्या काही तासांवर येवून ठेपला आहे. यावेळी गतविजेता फ्रान्स आणि लियोनेल मेस्सीचा अर्जेंटिना हे बलाढ्य संघ एकमेकांशी भिडणार आहेत. या सामन्यात फ्रान्स पुन्हा विजेतेपदाला गवसणी घालण्यासाठी तर मेस्सी इतिहास रचून ट्रॉफी उंचावण्यासाठी प्रयत्न करेल. मात्र विजय कोणाचाही झाला तरी खरी ट्रॉफी मात्र कोणालाच मिळणार नाही. काय आहे यामगचे कारण चला जाणून घेवू.

फिफा (FIFA) विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात विजेत्या संघाला मिळणाऱ्या ट्रॉफीची कथाही खूपच रंजक आहे. आजच्या अंतिम सामन्यातही विजेत्या संघाला खरी ट्रॉफी फक्त सेलिब्रेशन करण्यासाठीच मिळणार आहे. त्यानंतर फिफाचे अधिकारी ही खरी ट्रॉफी काढून घेतील. म्हणजेच अर्जेंटिना किंवा फ्रान्स संघाला ही ट्रॉफी घरी नेता येणार नाही. त्याऐवजी त्यांना डुप्लिकेट ट्रॉफी देण्यात येईल जी ब्रॉंझची असून त्यावर सोन्याचा थर चढवलेला असेल.

Fifa World Cup 2026, America, Mexico, Canada
FIFA WC Final: अबब! फिफा विश्वचषकातील संघांवर होणार तब्बल 589 कोटींची उधळण; विजेता संघ होणार मालामाल

फिफा विश्वचषकाची (Worldcup) ही खरी ट्रॉफी ज्युरिखमधील हेडक्वॉटरमध्येच असते. फिफा विश्वचषक किंवा फिफा दौऱ्यावेळीच ती जगासमोर आणली जाते. 2005 मध्ये विजेत्या संघाला ही ट्रॉफी न देण्याचा नियम बनवण्यात आला होता. मात्र याआधी ही ट्रॉफी विजेत्या संघाला देण्यात येत होती. या विश्वचषकाची सुरूवात 1930 मध्ये झाली होती.

सुरूवातीच्या काळात विजेत्या संघाला जी ट्रॉफी दिली जायची तिचे नाव ज्यूल्स रिमेट ट्रॉफी असे होते. ही ट्रॉफी 1970 पर्यंत विजेत्या संघाला दिली गेली. त्यानंतर या ट्रॉफीची नवी डिझायन करण्यात आली. ही डिझायन इटलीचा सिल्वियो गजानिया याने तयार केली ज्यानंतर 1974 पासून ही ट्रॉफी फिफा चषक म्हणून ओळखली जाऊ लागली.

Fifa World Cup 2026, America, Mexico, Canada
अमित शाहांच्या मध्यस्थीनंतरही कर्नाटक सरकारचा आडमुठेपणा कायम, महामेळाव्याला महाराष्ट्रातील नेत्यांना परवानगी नाकारली

या फिफा ट्रॉफीचे वजन 6.175 किलो असून त्यामध्ये 18 कॅरेट सोने वापरले आहे. ट्रॉफीची लांबी 36.8 सेमी आहे आणि त्याच्या पृष्ठभागाचा व्यास 13 सेमी आहे. ट्रॉफीच्या पायावर मॅलाकाइट स्टोनचे दोन थर लावण्यात आले आहेत. 1994 मध्ये या ट्रॉफीमध्ये थोडासा बदल करून विजेत्या संघाचे नाव लिहिण्यासाठी त्याच्या खालच्या भागात एक प्लेट लावण्यात आली होती. दरम्यान,अंतिम सामन्यातील विजेत्या संघाला 347 कोटी रुपये आणि उपविजेत्या संघाला 248 कोटी रुपये देण्यात येणार आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com