अमित शाहांच्या मध्यस्थीनंतरही कर्नाटक सरकारचा आडमुठेपणा कायम, महामेळाव्याला महाराष्ट्रातील नेत्यांना परवानगी नाकारली

महाराष्ट्रातून कर्नाटकमध्ये महामेळाव्यासाठी जाणाऱ्या नेत्यांना कर्नाटक सरकारने परवानगी नाकारली.
Basavraj Bemmai
Basavraj Bemmai Saam TV

>> रणजीत माजगावकर

कोल्हापूर : महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मध्यस्थी केली. मात्र या मध्यस्थीनंतर कर्नाटक सरकारची आडमुठेपणाची भूमिका कायम आहे. कारण बेळगावात होणाऱ्या महामेळाव्याला महाराष्ट्रातील नेते सहभागी होणार होते. मात्र मात्र त्यांना कर्नाटक सरकाने परवानगी नाकारली आहे. (Maharashtra Karnataka Border Dispute)

अमित शाह यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर सीमाभागत येण्यासाठी कुणालाही अडवणार नाही, असं कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी शब्द दिला होता. मात्र कर्नाटक सरकारची दुटप्पी भूमिका काही दिवसातच समोर आली आहे.

Basavraj Bemmai
Ajit Pawar: 'म्हणून सरकारच्या चहापानावर बहिष्कार...', अजित पवारांनी स्पष्टचं सांगितले

महाराष्ट्रातून कर्नाटकमध्ये महामेळाव्यासाठी जाणाऱ्या नेत्यांना कर्नाटक सरकारने परवानगी नाकारली. कर्नाटक राज्य सरकारचं हिवाळी अधिवेशन होत आहे. अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर बेळगावमध्ये 4 हजाराहून अधिक पोलीस तैनात आहे. मात्र कायदा सुव्यव्यस्थेचं कारण देत पुन्हा कर्नाटक सरकारने राज्यातील नेत्यांना परवानगी नाकारली आहे.  (Latest Marathi News)

महारष्ट्र एकीकरण समितीने आयोजित केलेल्या महामेळाव्याला महाराष्ट्रातून येणाऱ्यांना परवानगी दिली जाणार नाही. बेळगावातील जे लोक महामेळाव्याला येतील त्यांना आम्ही अडवणार नाही. मत्र खासदार धैर्यशील माने यांना बेळगावला येण्यासाठी परवानगी दिली जाणार नाही, असं कर्नाटकचे कायदा सुव्यवस्था विभागाचे अतिरिक्त पोलिस महासंचालक आलोक कुमार यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले.

Basavraj Bemmai
...तर आम्ही पण आंदोलन छेडणार, रामदास आठवले यांची 'पठाण' वादात उडी

महाराष्ट्रातून येणाऱ्या कोणालाही बेळगावातील महामेळाव्याला येण्यास अनुमती दिली जाणार नाही. महामेळावा होणार असलेल्या ठिकाणी आलोक कुमार यांनी भेट देऊन पाहणी केली. सीसीटीव्ही बसवण्याच्या सूचना त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. महामेळाव्यासाठी एका एसपी अधिकाऱ्यासह पाचशेहून अधिक पोलीस बंदोबस्तासाठी नेमण्यात आले आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com