फिफा विश्वचषक 2022: कतारमध्ये होणाऱ्या फिफा विश्वचषक 2022 महाअंतिम सामना काही तासांवर येवून ठेपला आहे. या अंतिम सामन्यात गतविजेता फ्रांसचा मुकाबला लियोनेल मेस्सीच्या अर्जेंटिनाशी होणार आहे. त्यामुळेच या हायहोल्टेज सामन्यात मेस्सीची स्वप्नपुर्ती होणार की फ्रान्स पुन्हा इतिहास रचणार याकडेच फुटबॉलप्रेमींचे लक्ष लागले आहे. सामन्यातील विजेत्या उपविजेत्या संघावर पैशांचा वर्षाव होणार आहे. पाहूया फिफा विश्वचषकात कोणत्या संघाला किती रक्कम मिळणार?
अर्जेंटिना आणि फ्रान्स दोन्ही संघ आज अंतिम सामन्यात एकमेकांसमोर उभे ठाकणार असून विश्वविजेते होण्यासाठी दोन्ही संघ प्रयत्न करतील. विजेत्या तसेच उपविजेत्या संघावर बक्षिसांची उधळण होणार आहे. ज्यामध्ये फ्रान्स किंवा अर्जेंटिना यापैकी कोणताही संघ हा विश्वचषक जिंकेल त्यांना 42 मिलियन डॉलर म्हणजेच अंदाजे 344 कोटी रुपये बक्षीस म्हणून मिळतील.
गतवर्षी 2018 मध्ये रशियात खेळल्या गेलेल्या विश्वचषकापेक्षा ही रक्कम चार दशलक्ष डॉलर्स जास्त आहे. दुसरीकडे, उपविजेत्या संघाला $30 दशलक्ष म्हणजेच सुमारे 245 कोटी रुपये मिळतील. त्याच वेळी, तिसऱ्या स्थानावर आलेल्या क्रोएशियाला $27 दशलक्ष म्हणजे अंदाजे 220 कोटी रुपये मिळतील.
चौथ्या क्रमांकावर आलेल्या मोरोक्कोला $25 मिलियन म्हणजेच सुमारे 204 कोटी रुपये मिळतील. पाचव्या ते आठव्या क्रमांकावर असलेल्या संघांना $17 दशलक्ष म्हणजेच सुमारे 138 कोटी रुपये मिळतील. त्याच वेळी, आठव्या ते 16 व्या क्रमांकावर असलेल्या संघांना $ 13 दशलक्ष दिले जातील. भारतीय रुपयात ही रक्कम 106 कोटी रुपये आहे.
पाचव्या क्रमांकावर नेदरलँड, सहाव्या क्रमांकावर इंग्लंड, सातव्या क्रमांकावर ब्राझील आणि आठव्या क्रमांकावर पोर्तुगाल आहे.FIFA विश्वचषक-2022 मधील संघांना बक्षीस म्हणून दिलेली संपूर्ण रक्कम पाहिली तर ती 440 दशलक्ष डॉलर्स आहे. जर त्याचे भारतीय रुपयात रूपांतर केले तर ते सुमारे 3600 कोटी आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.