germany vs france  x/ fifa
Sports

FIFA Under 17 World Cup Final: जर्मनीचा संघ ठरला जगज्जेता! पेनल्टी शूटआऊटमध्ये फ्रान्सला धूळ चारत पटकावलं जेतेपद

France vs Germany FIFA Under 17 World Cup Final: इंडोनेशियामध्ये फिफा अंडर १७ वर्ल्डकप स्पर्धेचा थरार पार पडला. या स्पर्धेतील फायनलमध्ये फ्रान्स आणि जर्मनी हे दोन्ही संघ आमने सामने आले होते

Ankush Dhavre

France vs Germany Final:

इंडोनेशियामध्ये फिफा अंडर १७ वर्ल्डकप स्पर्धेचा थरार पार पडला. या स्पर्धेतील फायनलमध्ये फ्रान्स आणि जर्मनी हे दोन्ही संघ आमने सामने आले होते. या सामन्यात जर्मनीने फ्रान्सला पराभूत करत विश्वविजेतेपदाला गवसणी घातली आहे.

या विजयासह जर्मनीने एकाच वर्षात एकाच वयोगटातील युरोपियन विजेतेपद आणि आणि जागतिक विजेतेपद पटकावण्याचा पराक्रम केला आहे.

फायनलमध्ये अतिरिक्त वेळेनंतरही सामना २-२ च्या बरोबरीत समाप्त झाला. त्यानंतर जर्मनीने पेनल्टी शूटआऊटमध्ये फ्रान्सला ४-३ ने धूळ चारली. यासह जर्मनीने पहिल्यांदाच १७ वर्षांखालील वर्ल्डकप स्पर्धेत विजय मिळवला आहे.

गोलकिपर कोनस्टाटीन हिड या सामन्यातील विजयाचा हिरो ठरला आहे. सामना पेनल्टी शूटआऊटमध्ये गेल्यानंतर त्याची भूमिका अतिशय महत्वाची ठरली. त्याने आपल्या संघासाठी दोन गोल रोखत मोलाचा वाटा उचलला.

या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, सामन्याच्या सुरुवातीलाच जर्मनीने गोल करत आघाडी घेतली. जर्मनीकडून २८ व्या मिनिटाला पॅरिस ब्रुनरने गोल केला. पहिल्या हाल्फच्या समाप्तीनंतर जर्मनीकडे १-० ची आघाडी होती. (Latest sports updates)

या सामन्यातील दुसऱ्या डावातही जर्मनीने दमदार सुरुवात केली. ५० व्या मिनिटाला कर्णधार नोह जार्वितने गोल करत संघाला २-० ची आघाडी मिळवून दिली. मात्र तिसऱ्या मिनिटालाच सायमन बौब्रेने गोल केला आणि फ्रान्सला या सामन्यात कमबॅक करुन दिलं.

नंतर फ्रान्सनेही जर्मनीवर दबाव वाढवला. मॅथिस अमोगोने ८५ व्या मिनिटाला गोल केला. यासह फ्रान्सने बरोबरी साधली. निर्धारी वेळ संपेपर्यंत ही बरोबरी कायम होती. अतिरिक्त वेळेत दोन्ही संघांना एकही गोल करता आला नाही. त्यामुळे पेनल्टी शूटआऊटच्या साहाय्याने निकाल लावण्यात आला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुणे महानगरपालिकेसाठी मनसेची उद्या मुंबईत महत्त्वाची बैठक

Sleeveless top fashion tips: तुमच्यासाठी कोणता टॉप परफेक्ट? स्लिव्हलेस की फुल स्लीव्ह्ज...ही एक सोपी ट्रिक करेल तुमची मदत

Mumbai : ठाकरे बंधूंचा महापालिकेत करेक्ट कार्यक्रम होणार, भाजपने सोडला टीकेचा बाण

चिनी लोकांचे डोळे लहान का असतात? कारण एकालाही माहित नाही

Manikrao Kokate : माणिकराव कोकाटे हॉस्पिटलमध्ये; सरेंडरसाठी ४ दिवसांचा वेळ मागितला, पण...

SCROLL FOR NEXT