Push-Ups Fitness Test: तुमच्या वयानुसार किती पुश-अप्स मारले पाहिजेत? तज्ज्ञांनी दिली महत्वाची माहिती, वाचा

Sakshi Sunil Jadhav

पुश - अप्सचे महत्व

तुम्ही रोज पुश - अप्स करत असाल तर तुमची छाती, खांदे, हात आणि कोअर हे मजबूत होतात. त्यामुळे तुम्हाला तुमची शारीरिक ताकद आणि सहनशक्ती किती आहे हे कळतं.

Push-Ups Fitness Test

२० वयोगटातले तरूण

तज्ज्ञांच्या मते, २० ते २९ वयोगटातल्या पुरुषांनी जास्तीत जास्त ३० ते ४५ पुश-अप्स केले पाहिजेत. तर महिलांनी १५ ते २९ पुश - अप्स केले पाहिजेत.

push ups by age

३० वयोगटतले व्यक्ती

३० ते ४० वयोगटातल्या पुरुषांनी २० ते ३४ पुश - अप्स करण्यावर भर दिला पाहिजे. तर महिलांनी १० ते २४ पुश - अप्स करणे योग्य ठरेल.

push ups by age

चाळिशीत फिटनेस

४० वर्षांनंतर पुरुषांनी १५ ते २८ आणि महिलांनी ६ ते १० पुश - अप्स करण्याची ताकद ठेवली पाहिजे. रोजच्या रोज व्यायाम केल्यावर तुम्ही सहज पुश - अप्स करू शकता.

how many push ups should I do

५० वयोगटातल्या व्यक्ती

५० ते ५९ वयोगटातल्या पुरुषांसाठी १० ते २४ पुश-अप्सचा आकडा योग्य मानला जातो. महिलांनी ३ ते १४ पुश-अप्स करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

how many push ups should I do

६० वर्षांनंतर अॅक्टीव्ह राहा

६० वर्षांवरच्या पुरुषांनी ६ ते १९ पुश - अप्स करण्याची ताकद ठेवली पाहिजे. महिलांसाठी १ ते १२ पुश - अप्सही फायदेशीर ठरू शकतात.

how many push ups should I do

योग्य तंत्र जास्त महत्त्वाचं

पुश - अप्स करताना शरीर सरळ ठेवा आणि योग्य फॉर्म राखण्याचा प्रयत्न करा. चुकीच्या पद्धतीने जास्त पुश-अप्स केल्यावर तुम्हाला दुखापत होऊ शकते.

how many push ups should I do

व्यायामाची रोजची सवय

तुम्ही रोज व्यायाम करत असाल तर तज्ज्ञांच्या मते, २० साव्या वर्षापासूनच रोज व्यायाम करणारा व्यक्ती ४०, ५० किंवा ६० व्या वर्षातही चांगला फिट राहू शकतो.

how many push ups should I do

सहा आठवड्यांचा प्लान

सुरुवातीला कमी पुश - अप्स करून हळूहळू संख्या तुम्ही वाढवू शकता. सातत्य, पुरेसा आराम आणि चांगलं रुटीन फॉलो केल्यामुळे सहा आठवड्यांत बऱ्याच सुधारणा दिसू शकतात.

how many push ups should I do

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.

how many push ups should I do

NEXT: चटकदार अन् भरपेट! अंबाडीच्या पानांच्या बनवा पातोड्या; सोपी स्टेप बाय स्टेप रेसिपी लगेचच करा नोट

Ambadi Patodi Recipe | google
येथे क्लिक करा