मेलबर्न कसोटीतील दुसऱ्या दिवासाचा शेवट होईपर्यंत भारताचा अर्धा संघ तंबूत परतला आहे. पहिल्या डावात फलंदाजी करताना यशस्वी जयस्वालने शानदार अर्धशतकी खेळी केली. तो शतक झळकावण्याच्या अगदी जवळ पोहोचला होता.
मात्र नेमकं तेव्हाच तो धावबाद होऊन माघारी परतला. विराट आणि जयस्वाल या दोघांमध्ये गैरसमज झाला, त्यामुळे जयस्वालला बाद व्हावं लागलं. आता जयस्वालच्या विकेटवरुन नवा वाद पेटला आहे.
यशस्वी जयस्वाल आणि विराट कोहली यांची जोडी चांगलीच जमली होती. दोघांमध्ये शतकी भागीदारी झाली होती. त्यामुळे ही जोडी भारतीय संघाला मजबूत स्थितीत पोहोचवणार अशी चिन्ह होती.
मात्र नेमकं तेव्हाच दोघांमध्ये गैरसमज झाला आणि यशस्वी जयस्वाल ८२ धावांवर धावबाद झाला. जयस्वाल बाद झाल्यानंतर एकच प्रश्न उपस्थित होतोय तो म्हणजे, नेमकी चूक कोणाची? यावरुन माजी भारतीय क्रिकेटपटू संजय माजंरेकर आणि इरफान पठाण यांच्यात जोरदार चर्चा रंगली.
संजय मांजरेकरांच्या मते, चूक विराटची होती. स्टार स्पोर्ट्सच्या कार्यक्रमात बोलताना संजय मांजरेकर म्हणाले, ' विराट कोहली चेंडूकडे पाहत राहिला. नॉन स्ट्राईकला असलेल्या फलंदाजाने नेहमी स्ट्राईकवर असलेल्या फलंदाजाकडे पाहावं. त्यामुळे चूक विराटची होती.'
यावर उत्तर देताना इरफान पठाण म्हणाला, ' चूक विराटची नव्हती. स्ट्राईकवर असलेल्या फलंदाजानेही पाहायला हवं की, चेंडू कुठे जातो.' यशस्वीच्या विकेटवरुन दोघांमध्ये चांगलाच वाद रंगला.
या सामन्यातील पहिल्या डावात फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने ४७४ धावा केल्या आहेत. या धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात आलेल्या भारतीय संघाकडून यशस्वी जयस्वालने सर्वाधिक ८२ धावांची खेळी केली.
तर विराट कोहलीने ३६ धावांची खेळी केली. तर केएल राहुलने २४ धावा केल्या. भारतीय संघाला ५ गडी बाद १६४ धावा करता आल्या आहेत. ऑस्ट्रेलियाकडे ३१० धावांची आघाडी आहे. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी भारतीय फलंदाज कमबॅक करण्याच्या प्रयत्नात असणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.