viral catch video twitter
Sports

Viral Catch Video: ख्रिस्तियानो जडेजा.. पठ्ठ्याने पायाने टिपला झेल; VIDEO पाहायलाच हवा

Viral Cricket Video: सोशल मीडियावर एक व्हिडिओ तुफान व्हायरल होतोय, ज्यात एका पठ्ठ्याने पायांच्या साहाय्याने झेल टिपला आहे. ज्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय.

Ankush Dhavre

क्रिकेटमध्ये फलंदाज आणि गोलंदाजापेक्षा क्षेत्ररक्षकही तितकाच महत्वाचा असतो. याचा प्रत्यय वेस्टइंडिजमध्ये झालेल्या टी-२० क्रिकेटच्या वर्ल्डकपच्या फायनलमध्ये पाहायला मिळाला. सूर्याने बाऊंड्री लाईनवर भन्नाट झेल टिपला आणि भारताने ११ वर्षांनंतर आयसीसीची ट्रॉफी उंचावली. दरम्यान युरोपियन क्रिकेट लीग स्पर्धेतील एका सामन्यात क्षेत्ररक्षकाने थेट पायाने झेल टिपला आहे. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

क्रिकेटमध्ये चेंडू अडवण्यासाठी क्षेत्ररक्षक अनेकदा पायाचा वापर करतात. मात्र तुम्ही कधी पायाने झेल टिपल्याचं पाहिलं आहे का? क्वचितच पाहिलं असेल. मात्र असं घडलंय युरोपियन प्रीमियर लीग स्पर्धेत. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतोय.

तर झाले असे की, युरोपियन क्रिकेट लीग स्पर्धेतील सामन्यात VTU-MP Pleven of Bulgaria आणि Afyonkarahisar SHS हे दोन्ही संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात Afyonkarahisar SHS संघाकडून खेळणाऱ्या क्षेत्ररक्षकाने कमालीचा झेल टिपला. त्याने पायाचा वापर करुन आधी चेंडू अडवला. त्यानंतर चेंडू हवेत उडवत हाताने झेल टिपला. हा झेल पाहून अंपायरसह फलंदाजही शॉक झाला.

या सामन्याबद्दल बोलायचं झालं, तर Afyonkarahisar SHS या संघाने नाणेफेक जिंकला आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना या संघाने १० षटकअखेर ५ गडी बाद १०४ धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना संघाला ८ गडी बाद ४० धावा करता आल्या. यासह हा सामना VTU-MU Pleven संघाला गमवावा लागला. मात्र या झेलचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ठाकरे गटाला भाजपचा जबरदस्त धक्का! २ बडे नेते मशाल सोडून कमळ हाती घेणार, कार्यकर्तेही भाजपच्या वाटेवर

Raj Thackeray and Uddhav Thackeray: बाळासाहेबांच्या फोटोसमोर दोन्ही भावांची भेट; राज-उद्धव ठाकरे यांच्यात २० मिनिटे चर्चा

Chanting mantras Brahma Muhurta: ब्रह्म मुहूर्तावर करा 'या' मंत्रांचा जप; नशीब क्षणार्धात बदलेल

Dnyanada Ramtirthkar: ज्ञानदा रामतीर्थकरचा प्रमोशन लूक, व्हाईट ड्रेसमध्ये दिल्या स्टायलिश पोज

Shahapur : अतिवृष्टीमुळे शेतातील बेडाघर कोसळले; झोपलेल्या शेतकऱ्याचा दबून मृत्यू

SCROLL FOR NEXT