Divya Deshmukh Chess World Cup x
Sports

Divya Deshmukh Chess World Cup : दिव्या देशमुख बनली वर्ल्ड चॅम्पियन! नागपूरच्या १९ वर्षीय लेकीनं घडवला इतिहास

Women's Chess World Cup Final 2025 : महिला बुद्धिबळ वर्ल्डकप स्पर्धेमध्ये १९ वर्षीय दिव्या देखमुखने ३८ वर्षीय कोनेरू हंपी यांचा पराभव केला आहे. दुसऱ्या टाय ब्रेकरमध्ये दिव्याने बाजी मारत सामना जिंकला.

Yash Shirke

  • FIDE महिला विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना रंगला. हा सामना दिव्या देशमुखने जिंकला आहे.

  • अंतिम स्पर्धेच्या टायब्रेकर सामन्यामध्ये दिव्या देशमुखने कोनेरू हंपी यांचा पराभव केला.

  • बुद्धिबळ विश्वचषक जिंकणारी दिव्या ही पहिली भारतीय महिला बुद्धिबळपटू ठरली आहे.

Divya Deshmukh vs Humpy Koneru World Chess Championship Final: महिला बुद्धिबळ वर्ल्डकप स्पर्धेचा अंतिम सामना कोनेरू हंपी आणि दिव्या देशमुख यांच्यामध्ये खेळला गेला. अंतिम फेरीच्या दोन्ही सामन्यात दोन्ही खेळाडूंनी १-१ अशी बरोबरी केली. त्यानंतर टाय ब्रेकर सामने खेळला गेला. पहिला टायब्रेकरमध्येही दोन्ही खेळाडूंनी बरोबरी केली. त्यानंतरच्या दुसऱ्या टाय ब्रेकरमध्ये दिव्या देशमुख हिने बाजी मारली.

१९ वर्षीय दिव्या देशमुखने FIDE महिला विश्वचषक स्पर्धेचे विजेतेपद जिंकले आहे. जगातील अव्वल महिला बुद्धिबळपटूंपैकी एक असलेल्या कोनेरू हंपीला पराभूत करुन दिव्याने ही कामगिरी केली आहे. अंतिम सामन्यात दोघींमध्ये अटीतटीची स्पर्धो होती. दोन्ही शास्त्रीय सामने अनिर्णित राहिले, त्यानंतर रॅपिड टायब्रेकरमध्ये निर्णय घेण्यात आला. दिव्या देशमुखने कोनेरू हंपी यांना १.५-०.५ अशा प्रकारे पराभूत केले. या विजयासह दिव्याने इतिहास रचला आहे. बुद्धिबळ विश्वचषक जिंकणारी ती पहिली भारतीय महिला बुद्धिबळपटू ठरली आहे.

विश्वचषकाच्या अंतिम सामन्यामध्ये विजय मिळवत दिव्या देशमुख भारताची ८८ वी गँडमास्टर बनली आहे. ग्रँडमास्टर ही पदवी बुद्धिबळातील सर्वात प्रतिष्ठित मानली जाते. गँडमास्टर बनने ही कोणत्याही बुद्धिबळपटूच्या कारकीर्दीतील सर्वात मोठी कामगिरी आहे. या विजयानंतर दिव्याला बक्षीस म्हणून सुमारे ४३ लाख रुपये मिळणार आहेत. तर हंपी यांना ३० लाख रुपये मिळणार आहेत.

महिला बुद्धिबळ स्पर्धेच्या अंतिम फेरीत दोन भारतीय बुद्धिबळपटू आमनेसामने येण्याची ही पहिलीच वेळ आहे. दोन्ही खेळाडू आता २०२६ मध्ये होणाऱ्या महिला बुद्धिबळ स्पर्धेसाठी पात्र ठरल्या आहेत. दिव्याने चीनच्या जिनर झू, भारताच्या डी हरिका यांचा पराभव केला. माजी विश्वविजेत्या टॅन झोंगी यांनीही तिने पराभूत केले. ती भारताची चौथी महिला गँडमास्टर बनली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: शेत रस्त्याच्या वादावरून तिघांना जबर मारहाण

टीव्ही पाहायचा की जाहिराती? आजींची थेट सुप्रिया सुळेंकडे तक्रार|VIDEO

Crime News : किरकोळ वाद जीवावर बेतला; सिमकार्ड चोरल्याचा संशय, सोबत राहणाऱ्या तरुणाकडून वृद्धाची हत्या

Pune Crime News: भंगार दुकानात चोरीसाठी आलेल्या चोरट्याला बेदम मारहाण; रात्रभर मारहाणीनंतर एकाचा मृत्यू, दोन जखमी

Badlapur Political News : बदलापुरात महायुतीत फूट; भाजप- राष्ट्रवादीचा एकनाथ शिंदेना धक्का

SCROLL FOR NEXT