Jasprit bumrah
Jasprit bumrah  Twitter
क्रीडा | IPL

Jasprit Bumrah News: जसप्रीत बुमराहवर BCCI मेहरबान! संघाबाहेर असूनही उधळणार कोट्यवधी रुपये,नेटकऱ्यांची जोरदार टीका

Ankush Dhavre

BCCI Central Contract: बीसीसीआयने टीम इंडियाचे वार्षिक कॉन्ट्रॅक जाहीर केले आहेत. या कॉन्ट्रॅकमध्ये भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह अजूनही ए प्लस श्रेणीत असल्याचे दिसून आले आहे.

बुमराहला ए प्लस श्रेणीत पाहून क्रिकेट चाहत्यांनी बीसीसीआयला प्रश्न विचारायला सुरुवात केली आहे. कारण दुखापतग्रस्त असलेला बुमराह हा गेल्या काही महिन्यांपासून संघाबाहेर आहे.

सहा महिन्यांपासून आहे संघाबाहेर..

जसप्रीत बुमराह हा भारतीय संघातील अनुभवी गोलंदाज आहे. मात्र गेली ६ महिने तो भारतीय संघातून बाहेर आहे. (Latest sports updates)

दुखापतीमुळे तो आगामी आयपीएल, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेतून बाहेर झाला आहे. तसेच तो आगामी वनडे वर्ल्ड कप स्पर्धेतूनही बाहेर होऊ शकतो.

सप्टेंबर २०२२ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या टी -२० मालिकेत त्याला पाठदुखीचा त्रास झाला. या सामन्यातून बाहेर झाल्यानंतर तो संघात पुनरागमन करू शकला नाही. तरीदेखील बीसीसीआय आता त्याला वर्षाला ७ कोटी रुपये देणार आहे.

जसप्रीत बुमराहला ए प्लस श्रेणीत पाहून क्रिकेट चाहते संताप व्यक्त करताना दिसून आले आहे. अनेकांचे म्हणणे आहे की, संघाबाहेर असताना जसप्रीत बुमराहला ए प्लस श्रेणीत स्थान का दिलं?

तर दुसऱ्या एका युजरचे म्हणणे आहे की, जसप्रीत बुमराह ऐवजी मोहम्मद शमीचा ए प्लस श्रेणीत समावेश करायचा होता.

तर आणखी एका युजरचे म्हणणे आहे की, जसप्रीत बुमराहला थेट कॉन्ट्रॅकच्या यादीतून बाहेर केलं गेलं पाहिजे.

बीसीसीआयने जाहीर केलेल्या वार्षिक कॉन्ट्रॅकची यादी.

ग्रेड ए प्लस - रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जडेजा.

ग्रेड ए - हार्दिक पंड्या, रविचंद्रन अश्विन, मोहम्मद शमी, ऋषभ पंत, अक्षर पटेल.

ग्रेड बी - लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, चेतेश्वर पुजारा, मोहम्मद सिराज, सूर्यकुमार यादव, शुभमन गिल.

ग्रेड सी - शिखर धवन, शार्दुल ठाकूर, उमेश यादव, इशान किशन, दीपक हुडा, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai News : जेव्हीएलआर मार्गावरील वाहतुकीत ३१ मे पर्यंत बदल, नेमकं काय आहे कारण?

LSG vs KKR : कोलकाताकडून लखनऊचा दारूण पराभव, पॉइंट्स टेबलमध्ये मोठा उलटफेर

Canada Import from India : कॅनडा भारताकडून काय मागवतो

Uddhav Thackeray: मोदींचं PM पदासाठी नाव सुचवलं हे माझं पाप, उद्धव ठाकरे यांनी भरसभेत व्यक्त केली खंत

Mumbai Local : तीन प्रवाशांच्या मृत्यूनंतर मध्य रेल्वेला आली जाग; लोकलच्या गर्दी नियंत्रणासाठी घेतला मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT