
Sportradar Integrity Services Report: क्रिकेट विश्वातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. स्पोर्टरडार इंट्रीग्रिटी सर्व्हिसेसच्या एका अहवालात एक खळबळजनक दावा करण्यात आला आहे. या अहवालात म्हटले गेले आहे की, २०२२ मध्ये झालेले १३ क्रिकेटचे सामने फिक्स होते.
या अहवालाला 'सट्टेबाजी, भ्रष्टाचार आणि मॅच फिक्सिंग..'असं नाव देण्यात आलं आहे. हा अहवाल एकूण २८ पानांचा आहे.
या अहवालात असं म्हटलं गेलं आहे की, २०२२ वर्षात ९२ देशांमध्ये एकूण १२ इव्हेंट झाले. यापैकी १२१२ सामने फिक्स असल्याचा संशय होता. (Latest sports updates)
स्पोर्टरडार इंट्रीग्रिटी सर्व्हिसेस (Sportradar Integrity Services Report) बद्दल सांगायचं झालं तर ही एक अशी टीम आहे जी बेकायदेशीर सट्टेबाजी, मॅच फिक्सिंग आणि खेळांमधील भ्रष्टाचाराच्या इतर प्रकारांचे विश्लेषण करते.
स्पोर्टरडार इंट्रीग्रिटी सर्व्हिसेसच्या अहवालानुसार, फुटबॉल खेळात सर्वात जास्त भ्रष्ट्राचार झाल्याचे पाहायला मिळाले आहे.
गतवर्षी ७७५ सामने असे होते, ज्यात फिक्सिंग झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तर बास्केटबॉल दुसऱ्या स्थानी आहे. बास्केटबॉलचे २२० सामने फिक्स असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
तर क्रिकेट हा खेळ सहाव्या स्थानी आहे. या अहवालात क्रिकेटचे १३ सामने फिक्स असल्याचा अंदाज व्यक्त केला गेला आहे.
मात्र भारतात एकही सामना फिक्स झाला नव्हता. असा उल्लेख या अहवालात करण्यात आला आहे. जगातील सर्वात मोठी क्रिकेट लीग स्पर्धा आयपीएल स्पर्धेत सामने फिक्सिंग असतात असं म्हटलं जातं.
मात्र स्पोर्टरडार इंट्रीग्रिटी सर्व्हिसेसने २०२० मध्ये बीसीसीआयच्या भ्रष्टाचार विरोधी पथकासोबत मिळून शोध घेतला होता. यात कुठलाही सामना फिक्स नसल्याचे समोर आले होते.
महिला टी -२० वर्ल्ड कप २०२३ स्पर्धेत सामना फिक्स असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. बांगलादेशच्या जमूना टीव्ही या आउटलेटने एक ऑडिओ क्लिप शेअर केला होता.
ज्यात बांगलादेश संघातील २ खेळाडू एकमेकांसोयाबीत चर्चा करताना दिसून आले होते. एका खेळाडूचे नाव लता मंडल असे होते. ती बांगलादेश संघासह दक्षिण आफ्रिकेला रवाना झाली होती. तर दुसऱ्या खेळाडूची संघात निवड झाली नव्हती.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.