Cricket News: 'मला विष देऊन मारण्याचा रचला कट, शाहिद आफ्रिदीने दिले होते ४०-५० लाख...', पाकिस्तानी क्रिकेटरचा मोठा खुलासा

Imran Nazir: पाकिस्तान संघातील माजी फलंदाजाने एक मोठे वक्तव्य केले आहे.
Pakistan Cricket Team
Pakistan Cricket Team Twitter
Published On

Imran Nazir Statement: पाकिस्तान संघातील माजी फलंदाजाने एक मोठे वक्तव्य केले आहे. माजी सलामीवीराने केलेल्या खुलास्यानुसार त्याला जीवे मारण्याचा कट रचला गेला होता.

इमरान नजीरचे म्हणणे आहे की, त्याला जेवणात विषारी पदार्थ कालवून दिले जात होते. आता या खुलास्यानंतर एकच खळबळ उडाली आहे.

Pakistan Cricket Team
WPL Eliminator : मुंबईची पलटण की युपीचे वॉरियर्स? कोण खेळणार WPL फायनल? पाहा दोन्ही संघांची प्लेइंग 11

इमरान नजीरने म्हटले की, नुकताच माझ्यावर उपचार करण्यात आले आणि माझ्या एमआरआय स्कॅनसह अनेक चाचण्या देखील करण्यात आल्या. या सर्व तपासणीचा योग्य निष्कर्ष असा होता की मला कोणीतरी मरकरी नावाचे विष दिले आहे.

ते आपल्या शरीराच्या सांध्यापर्यंत पोहोचते आणि खूप नुकसान करते. या दरम्यान मी ८ ते १० वर्षे माझ्या सांध्यावर सतत उपचार केले. कारण मला सांधेदुखीचा खूप त्रास झाला होता.' (Latest sports updates)

Pakistan Cricket Team
Suryakumar Yadav: 'हे चुकीचं आहे,सूर्यकुमार यादवची तुलना संजू सॅमसन सोबत करूच नका..' माजी क्रिकेटपटूचे मोठे वक्तव्य

तसेच तो पुढे म्हणाला की,' मला सलग ६-७ वर्षे सांधेदुखीचा त्रास होता. त्यामुळे मी देवाकडून एकच मागणी केली होती की, मला बेडवर पडून राहायचं नाहीये. नशिबाने असं काही झालं नाही. मी उपचार केले आणि आता मला बरं वाटत आहे. त्यामुळेच मी तुमच्या समोर उभा आहे. हे सर्व सुरू असताना मला काही लोकांवर शंका आली होती. मात्र पुरावे नसल्याने मी काहीच बोलता आले नव्हते.'

तसेच या कठीण काळात त्याला पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीने मोठी मदत केली होती. त्याने इमरान नजीरला ४० ते ५० लाख रुपये दिले होते.

Pakistan Cricket Team
Shreyas Iyer : IPL तोंडावर असताना श्रेयस अय्यरचा मोठा निर्णय! दुखापतग्रस्त असूनही सर्जरी करण्यास दिला नकार

इमरान नजीर असे देखील म्हटले की, मरकरीचा परिणाम लवकर दिसून येत नाही. ते हळू हळू शरीरात पसरते. त्यानंतर त्याचे दुष्परिणाम दिसू लागतात.

तसेच त्याच्या करकीर्दीबद्दल बोलायचं झालं तर, त्याने ८ कसोटी सामन्यांमध्ये ४२७ तर ७९ वनडे सामन्यांमध्ये १८९५ आणि २५ टी-२० समान्यांमध्ये ५०० धावा केल्या आहेत. त्याने १९९९ पासून ते २०१२ पर्यंत पाकिस्तान संघाचे प्रतिनिधित्व केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com