Uddhav Thackeray: मोदींचं PM पदासाठी नाव सुचवलं हे माझं पाप, उद्धव ठाकरे यांनी भरसभेत व्यक्त केली खंत

Lok Sabha Election 2024: 2014 साली भाजपने तुमचं (नरेंद्र मोदी) नाव सुचवलं. त्यावेळी राजनाथ सिंह यांनी मला विचारलं, तेव्हा मी हे नाव दिलं, हे माझं पाप आहे, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी खंत व्यक्त केली आहे.
Uddhav Thackeray On Pm Modi
Uddhav Thackeray On Pm ModiSaam Tv

Uddhav Thackeray On Pm Modi:

>> सिद्धेश म्हात्रे

2014 साली भाजपने तुमचं (नरेंद्र मोदी) नाव सुचवलं. त्यावेळी राजनाथ सिंह यांनी मला विचारलं, तेव्हा मी हे नाव दिलं, हे माझं पाप आहे, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी खंत व्यक्त केली आहे. आज नवी मुंबईत ठाकरे गटाची सभा पार पडली. यावेळी बोलताना ते असं म्हणाले आहेत.

या सभेत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, ''काश्मीरमध्ये अजूनही हल्ले होतायत. 10 वर्षांपासून तुम्ही सत्तेत आहेत. मात्र तुमच्या नादनपणामुळे जवानांनी जीव गमावला. सत्यपाल मलिक यांनी तुम्हाला उघड पाडलं. याबद्दल का बोलत नाहीत.'' मोदींवर टीका करत ते म्हणाले, ''त्यांना महागाई बेरोजगारीवर बोलताना पाहिलंय का?''

Uddhav Thackeray On Pm Modi
Sharad Pawar News: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द; प्रकृतीमुळे घेतला निर्णय

उद्धव ठाकरे यांची नकली सेना असल्याचं वक्तव्य अमित शाह यांनी केलं होतं. यावर बोलतां ते म्हणाले, ''नकली सेना म्हणतात, मात्र अजून सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिलेला नाही. शिवसेना नाव माझ्या आजोबांनी दिलेलं, ते तुमची चोरू शकत नाही.''

उद्धव ठाकरे म्हणाले, ''आता मशाल कशी जाळून टाकते, काय जळते ते कळेल. महाराष्ट्र तुमची खुर्ची खेचून घेतल्याशिवाय राहणार नाही. हे काम एकटा महाराष्ट्र करू शकतो. एकही जागा दिली नाही, तर मोदी सरकार राहणार नाही.''

Uddhav Thackeray On Pm Modi
Prajwal Revanna: प्रज्वल रेवन्नाविरोधात ब्लू कॉर्नर नोटीस जारी, जाणून घ्या काय आहे या नोटीसचा अर्थ

ते पुढे म्हणले, ''महाराष्ट्र कोरोनाशी लढत असताना तुम्ही (नरेंद्र मोदी) टीव्हीवर थाळ्या वाजवा बोलत होतात. तेव्हा 10 रुपयात आम्ही जेवण देत होतो. उत्तर प्रदेशात प्रेत फेकून दिली जात होती, त्यावेळी आम्ही विटंबना होऊ दिली नाही.''

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com