Sharad Pawar News: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द; प्रकृतीमुळे घेतला निर्णय

Maharashtra Politics: बारामतीमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. शरद पवार यांची तब्येत बिघडल्यामुळे त्यांचे उद्याचे सर्व नियोजित कार्यक्रम करण्यात आले रद्द आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांच्या अनेक सभा होत्या.
शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द; प्रकृतीमुळे घेतला निर्णय
Sharad Pawar NewsSaam TV
Published On

Sharad Pawar News:

>> अक्षय बडवे

बारामतीमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. शरद पवार यांची तब्येत बिघडल्यामुळे त्यांचे उद्याचे सर्व नियोजित कार्यक्रम करण्यात आले रद्द आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांच्या अनेक सभा होत्या. तसेच अनेक नियोजित कार्यक्रम होते. मात्र तब्येत अस्वस्थामुळे शरद पवारांचे कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती पक्षाच्या वतीने देण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आज बारामती येतेच शरद पवार यांची सांगता सभा होती. या सभेदरम्यान शरद पवार यांना काहीसा त्रास जाणवल्याने त्यांनी थोडक्यात भाषण केलं. यातच आता शरद पवार गटाच्या वतीने सांगण्यात आलं आहे की, शरद पवार यांचे उद्याचे जे नियोजित कार्यक्रम आहेत, ते रद्द करण्यात आले आहेत.

शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द; प्रकृतीमुळे घेतला निर्णय
Prajwal Revanna: प्रज्वल रेवन्नाविरोधात ब्लू कॉर्नर नोटीस जारी, जाणून घ्या काय आहे या नोटीसचा अर्थ

सध्या शरद पवार हे बारामती येथील त्यांचं निवासस्थान असलेल्या गोविंद बागेत आहेत. दुपारची सांगता सभा झाल्यानंतर ते गोविंद बागेत आले, यानंतर आज शरद पवार हे येथेच मुक्काम करणार असल्याची माहिती मिळत आहे.

दरम्यान, शरद पवार हे गेल्या अनेक दिवसांपासून महाविकास आघाडीचे ज्येष्ठ नेते असल्याने राज्यभरात अनेक ठिकाणी सभा घेत होते. मविआच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी त्यांनी राज्यभरात अनेक ठिकाणी दौरे केले आहेत. सततचे कार्यक्रम आणि दौऱ्यांमुळे झालेल्या धगधगीमुळे त्यांना आता अस्वस्थ वाटतं असावं, असं बोललं जात आहे.

शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द; प्रकृतीमुळे घेतला निर्णय
Maharashtra Politics: भाषणादरम्यान रोहित पवार ढसाढसा रडले, अजित पवारांनी भरसभेत केली नक्कल; VIDEO

दरम्यान, याबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी साम टीव्हीने शरद पवार गटाच्या काही नेत्यांशी संपरक साधला. यावेळी शरद पवार गटाच्या नेत्यांनी सांगितलं की, त्यांची तब्येत स्थिर असून एक दिवस विश्रांती म्हणून उद्याचे सगळे कार्यक्रम रद्द करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com