team india vs pakistan  Saam tv
Sports

टीम इंडिया आणि पाकिस्तान टी२० वर्ल्डकपमध्ये पुन्हा आमनेसामने येणार? काय आहे समीकरण?

team india vs pakistan : टीम इंडिया आणि पाकिस्तान टी२० वर्ल्डकपमध्ये पुन्हा आमनेसामने येण्याची शक्यता आहे. जाणून घ्या कसं असेल समीकरण.

Saam Tv

भारताचा सुपर ८ मध्ये प्रवेश

पाकिस्तानची एन्ट्री उद्याच्या सामन्यानंतर ठरणार

दोन्ही संघ एकाच गटात आल्यास सामना होण्याची शक्यता

टीम इंडियाने टी२० वर्ल्डकप स्पर्धेत रविवारी पाकिस्तानला ६१ धावांनी धूळ चारली. या विजयानंतर टी२० वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाने पाकिस्तानविरोधात ८ वा विजय मिळवला आहे. पाकिस्तानला धूळ चारल्यानंतर सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात टीम इंडिया सुपर ८ स्टेजमध्ये पोहोचली आहे. तर पाकिस्तानला क्वालिफाय होण्यासाठी नामीबिया संघाला पराभव करावा लागणार आहे. नामीबियाचा पाकिस्तानशी १८ फेब्रुवारी रोजी ३ वाजता सामना होणार आहे. या सामन्याने भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याची शक्यता वाढवली आहे.

टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये एकूण २० संघांनी सहभाग नोंदवला आहे. या २० संघांना ४ गटात विभागण्यात आलं आहे. या गटांना ए, बी, सी आणि डी असे ग्रुपला नाव देण्यात आलं आहे. प्रत्येक ग्रुपमध्ये ५ टीम आहेत. प्रत्येक ग्रुपमधील टॉप-२ टीम सुपर ८ मध्ये पोहोचतील. सुपर-८ मध्ये पोहोचणारे ८ संघ हे प्रत्येकी ४-४ संघात विभागले जातील. त्यानंतर ग्रुपमध्ये राऊंड रॉबिन फॉर्मेटने सामने होण्याची शक्यता आहे.

या फॉर्मेटअंतर्गत प्रत्येक टीमचा एकमेकांशी सामना होईल. त्यानंतर दोन्ही ग्रुपमधील टॉप २ संघ सेमीफायनलमध्ये स्थान निश्चित करतील. त्यानंतर त्यांचा फायनलमध्ये जाण्याचा मार्ग मोकळा होईल. यादरम्यान टीम इंडिया आणि पाकिस्तानाचा पुन्हा सामना होण्याची शक्यता आहे.

भारत आणि पाकिस्तानचा सामना सुपर-८ मध्ये होण्याची शक्यता कमी आहे. प्री-सीडिंग अरेंजमेंटअंतर्गत भारत आणि पाकिस्तानला वेगवेगळ्या सुपर-८ ग्रुपमध्ये ठेवण्यात येईल. या स्टेजमध्ये टीमचा फक्त ग्रुपमधील संघाशी सामना होईल. त्यामुळे सुपर-८ मध्ये भारत आणि पाकिस्तानचा पुन्हा सामना होणे अशक्य आहे.

भारत आणि पाकिस्तानचा फायनलमध्ये सामना होण्याची शक्यता आहे. दोन्ही संघ सेमीफायनलमध्ये जिंकले. तसेच त्यांच्या ग्रुपमधील सामने जिंकल्यास पुन्हा सामना होण्याची शक्यता आहे. असं घडलं तर टी-२० वर्ल्डकपमध्ये २००७ सालानंतर पहिल्यांदा दोन्ही संघ फायनलमध्ये भिडतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thane Water Cut: ठाणेकरांसाठी महत्वाची बातमी, ३ जून रोजी पाणीपुरवठा राहणार बंद, कोणकोणत्या भागांना बसणार फटका?

Deepali Sayyad: 'कितीही धमक्या येऊ द्या....'; भोंदू अशोक खरातवरील चित्रपटाबाबत अभिनेत्री दीपाली सय्यदची ठाम भूमिका

Maharashtra News Live Update: नीट पेपरफुटी प्रकरणी सर्वात मोठी अपडेट, मनीषा हवलदार आणि तेजस शहा यांच्या मधला दुवा सापडला?

राज्यात घराणेशाहीची दुसरी इनिंग, मुलांच्या आमदारकीसाठी नेत्यांचं लॉबिंग, नेत्यांच्या मुलांसाठी निष्ठावंतांना डावलणार?

पुण्यात विषारी दारुचे 14 बळी, पुणे पोलीस करतायत तरी काय, संतप्त नागरिकांनी दारूचा अड्डा केला उद्ध्वस्त!

SCROLL FOR NEXT