Babar azam  twitter
Sports

Viral Video: क्या फॅन बनेगा रे तू... Babar Azamला भेटायला चाहता मैदानात घुसला,पण पुढे भलतंच घडलं- VIDEO

Babar Azam Fan Viral Video: पाकिस्तानचा फलंदाज बाबर आझमच्या फॅनचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

Ankush Dhavre

पाकिस्तानमध्ये चॅम्पियन्स वनडे कप २०२४ स्पर्धेला प्रारंभ होणार आहे. या स्पर्धेला येत्या १२ सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेत ५ संघ खेळताना दिसून येणार आहे. या स्पर्धेसाठी खेळाडू कसून मेहनत करताना दिसून येत आहेत. दरम्यान खेळाडूंचा सराव सुरु असताना एक फॅन मैदानात आल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

या स्पर्धेत बाबर आझम देखील खेळताना दिसून येणार आहे. त्यामुळे बाबरला खेळताना पाहण्यासाठी फॅन्सने तुफान गर्दी केल्याचे पाहायला मिळाले होते. गेल्या काही महिन्यांपासून बाबर आझमचा फ्लॉप शो सुरुच आहे. नुकताच बांगलादेशविरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेतही त्याची बॅट शांतच राहिली. या मालिकेत पाकिस्तानला लाजीरवाण्या पराभवाचा सामना करावा लागला. दरम्यान बाबर आझम आपला फॉर्म पुन्हा मिळवण्याच्या प्रयत्नात असणार आहे.

फॅनचा मैदानात प्रवेश

सोशल मीडियावर एक व्हिडिओ तुफान व्हायरल होतोय, ज्यात खेळाडूंचा सराव सुरु असताना एक फॅन मैदानात प्रवेश करताना दिसून येतोय. माध्यमातील वृत्तानुसार, मैदानात घुसखोरी करणारा फॅन हा बाबर आझमला भेटण्यासाठी मैदानात आला होता. मात्र तो त्याला न भेटताच पुढे निघून गेला.

त्यानंतर सेक्युरीटी गार्ड त्याला पकडण्यासाठी त्याच्या मागे धावले. त्यावेळी हॅरिस रऊफने त्या फॅनला सेक्युरीटी गार्डपासून वाचवलं आणि मैदानाबाहेर सोडलं. या कृत्यामुळे हॅरिस रऊफचं कौतुक होतय, तर बाबर आझमला ट्रोल केलं जात आहे.

काही युझर्सचं म्हणणं आहे की, बाबरला भेटण्यासाठी आलेला फॅन हा बाबरला न भेटताच पुढे निघून गेला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

चॅम्पियन्स वनडे कप स्पर्धेसाठी असा स्टॅलियन्स संघ:

मोहम्‍मद हारिस (कर्णधार), अहमद, आदिल अमीन, आझम खान, बाबर आझम, हॅरिस रऊफ,माज अहमद सदाकत, मोहम्‍मद आमिर खान, साद खान, शमिल हुसेन, शान मसूद, तैयब ताहिर, उबेद शाह, यासिर खान आणि जमन खान, मेहरान मुमताझ, मोहम्‍मद अली, हुसेन तलत, जहनदाद खान, जुनैद अली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking News: स्तन वाढवण्यासाठी सर्जरी केली, काही तासांत १४ वर्षांच्या मुलीचा मृत्यू; नेमकं काय घडलं?

Maharashtra Live News Update: सोलापूर दौऱ्यावर असणाऱ्या मंत्री भरत गोगावले यांचा ताफा शेतकऱ्यांनी रोखला

Mumbai Local Block: मध्य रेल्वेवर २ दिवसांचा रात्रकालीन ब्लॉक; लोकलसह ट्रेनच्या वेळापत्रकात बदल, वाचा सविस्तर

Sakhi Gokhale: मन तुझं जलतरंग, लहरी तुझा साज...

Prabalgad Fort History: ट्रेकिंगसाठी खास! सह्याद्री पर्वतरांगेतील प्रबळगड किल्ल्याचे ऐतिहासिक वैशिष्ट्ये आणि इतिहास

SCROLL FOR NEXT