virat kohli twitter
Sports

Virat Kohli Viral Video: चोकली,चोकली..चिडवणाऱ्या फॅनवर विराट भडकला! रागात जे केलं ते एकदा पाहाच - VIDEO

Virat kohli Reaction On Chokli: श्रीलंकेत एका फॅनने विराटला चोकली म्हणून हाक मारली. त्यानंतर विराटने जे केलं, ते एकदा पाहाच.

Ankush Dhavre

भारत आणि श्रीलंका या दोन्ही संघांमध्ये ३ टी-२० सामन्यांची मालिका पार पडली. या मालिकेत भारतीय संघाने ३-० ने बाजी मारली. आता भारतीय संघ ३ वनडे सामन्यांची मालिका खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे. भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली या मालिकेतून कमबॅक करताना दिसून येणार आहे. या मालिकेसाठी विराट कोहली कोलंबोत दाखल झाला आहे. दरम्यान ही मालिका सुरु होण्यापूर्वीच त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होऊ लागला आहे.

विराट कोहलीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय, ज्यात विराट कोहली बॅट घेऊन सराव करताना दिसतोय. त्याचवेळी एक फॅन त्याला चोकली म्हणून चिढवताना दिसून येतोय. हे ऐकताच विराट भडकल्याचे दिसून येत आहे. विराटने दिलेल्या रिअॅक्शनचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

चोकली म्हणजे काय?

सोशल मीडियावर विराट कोहलीचा मोठा चाहतावर्ग आहे. त्याची फॅन फॉलोवींग ही कोट्यावधींच्या घरात आहे. यासह त्याला ट्रोल करणाऱ्यांची संख्याही अधिक आहे. विराटला चिडवण्यासाठी ट्रोलर्स चोकली या शब्दाचा वापर करतात. महत्वाच्या स्पर्धांमध्ये फ्लॉप कामगिरी केल्यानंतर चोकींग हा शब्द वापरला जातो.

त्यामुळे कोहली आणि चोकींग हा शब्द एकत्र करुन चोकली हा शब्द तयार करण्यात आला आहे. भारतीय संघाने २०१९ वनडे वर्ल्डकपच्या सेमिफायनलमध्ये प्रवेश केला होता. त्यावेळी विराट १ धाव करत माघारी परतला होता. त्यनंतर २०१७ चॅम्पियन्स ट्रॉफी आणि २०१५ वनडे वर्ल्डकप स्पर्धेतही तो स्वस्तात माघारी परतला होता. तेव्हापासून ट्रोलर्स त्याला चोकली या नावाने चिडवताय.

आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धा झाल्यानंतर विराट कोहलीने टी -२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र तो वनडे आणि कसोटी क्रिकेट खेळताना दिसून येणार आहे. त्याचा श्रीलंकेविरुद्धचा रेकॉर्ड पाहिला, तर त्याने ५३ सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याने २५९४ धावा केल्या आहेत. ज्यात १० शतक आणि १२ अर्धशतकांचा समावेश आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monsoon Alert : पुण्याला रेड अलर्ट, घाटमाथ्यावर धो धो कोसळणार, पुढील ५ दिवस आषाढधारा, वाचा हवामानाचा अंदाज

CHYD : कॉमेडीचा डॉन परत येतोय! 'चला हवा येऊ द्या २'मध्ये मराठमोळ्या अभिनेत्याची धमाकेदार एन्ट्री, पाहा VIDEO

Maharashtra Live News Update: डोंबिवली रेल्वे स्टेशनवर एकादशी वारीचा पारंपरिक गजर

दारु पिऊन शिक्षकाचा शाळेतच विद्यार्थ्यांसोबत डान्स; व्हिडिओ पाहून राग अनावर होईल

Shirdi Sai Temple: विठू माऊली तू, माऊली जगाची...; आषाढीचा उत्साह शिर्डीत, फुलांनी सजले साई मंदिर

SCROLL FOR NEXT