faf du plessis fined by ipl rupees 12 lakhs for slow over rate during kkr vs rcb match amd2000 twitter
क्रीडा

KKR vs RCB, IPL 2024: पराभवासोबतच फाफ डू प्लेसिसला आणखी एक मोठा धक्का! BCCI ने घेतली मोठी ॲक्शन

Ankush Dhavre

कोलकाताच्या ईडन गार्डन्स मैदानावर कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु हे दोन्ही संघ आमने सामने आले होते. या अटीतटीच्या लढतीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाला शेवटच्या चेंडूवर पराभवाचा सामना करावा लागला आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाला हा सामना जिंकण्यासाठी २२२ धावांची गरज होती.

या धावांचा पाठलाग करताना कर्ण शर्माने मिचेल स्टार्कच्या शेवटच्या षटकात हल्लाबोल करत ३ षटकार मारले. मात्र अथक प्रयत्न केल्यानंतरही रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा संघ विजयापासून केवळ १ धाव दूर राहिला. दरम्यान या सामन्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाचा कर्णधार फाफ डू प्लेसिसवर बीसीसीआयकडून कारवाई करण्यात आली आहे.

नेमकं काय घडलं?

एकवेळ सामना हातातून गेला असताना शेवटच्या षटकात कर्ण शर्मा संकटमोचक म्हणून धावून आला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाने विजयाची आशा सोडली होती. मात्र नेमकं त्याचवेळी कर्ण शर्माने मिचेल स्टार्कच्या गोलंदाजीवर ३ षटकार खेचले. शेवटच्या चेंडूवर या संघाला जिंकण्यासाठी ३ धावांची गरज होती. मात्र हा संघ विजयापासून १ धाव दूर राहिला. दरम्यान या सामन्यानंतर फाफ डू प्लेसिसवर १२ लाखांचा दंड आकारण्यात आला आहे.

कोलकाता नाईट रायडर्स संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा संघ नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्यासाठी मैदानावर उतरला. प्रथम गोलंदाजी करत असताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाला निर्धारीत वेळेत २० षटकं टाकता आलेली नाहीत. त्यामुळे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाचा कर्णधार फाफ डू प्लेसिसला १२ लाखांचा दंड ठोठावला आहे.

RCB च्या हातचा सामना निसटला..

या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने टॉस जिंकत कोलकाता नाईट रायडर्स संघाला प्रथम फलंदाजी करण्याचं आमंत्रण दिलं. प्रथम फलंदाजी करताना कर्णधार श्रेयस अय्यरने अर्धशतकी खेळी केली. दरम्यान या खेळीच्या बळावर संघाची धावसंख्या २२२ धावांवर पोहोचवली. या धावांचा पाठलाग करताना विल जॅक्सने ताबडतोड अर्धशतकी खेळी केली. दरम्यान शेवटच्या षटकात अशक्य असं वाटणाऱ्या धावांचा पाठलाग करताना कर्ण शर्माने ३ षटकार खेचले आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाला कमबॅक करुन दिलं. मात्र शेवटच्या चेंडूवर कोलकाता नाईट रायडर्स संघाला हा सामना एका धावेने गमवावा लागला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sunday Horoscope: रविवारी या 3 राशींचे भाग्य सूर्या सारखे चमकणार, गणरायाची होईल कृपा

Best Selling Cars: या ५ कार्सची बाजारात वाढली मागणी, खरेदीसाठी होतेय गर्दी; पाहा लिस्ट

Maharashtra Politics : राऊतांचे वार, मनोज जरांगेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार; नेमकं राज्यात काय राजकारण शिजतंय? VIDEO

Rashi Bhavishya Today : अचानक धनलाभ होण्याची शक्यता, आरोग्याची काळजी घ्या; वाचा रविवारचे राशीभविष्य

Weight Loss: जीममध्ये न जाता वजन कसे कमी कराल?

SCROLL FOR NEXT