sania mirza twitter
Sports

Mohammed Shami: मोहम्मद शमी अन् सानिया मिर्झा खरंच दुबईच्या बिचवर एकत्र गेले का? काय आहे सत्य?- Fact Check

Mohammed Shami- Sania Mirza Viral Photo: मोहम्मद शमी आणि सानिया मिर्झाचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय, हा फोटो खरा आहे की खोटा, जाणून घ्या.

Ankush Dhavre

गेल्या काही दिवसांपासून मोहम्मद शमी सानिया मिर्झाचा एक फोटो व्हायरल होतोय. व्हायरल फोटोमध्ये असा दावा केला जातोय, की दोघेही दुबईत सुट्ट्यांचा आनंद घेत आहेत. सानिया मिर्झा आणि पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब मलिक यांचा घटस्फोट झाला आहे. तर दुसरीकडे शमीही आपल्या पत्तीपासून वेगळा राहतोय.

दोघेही विवाहात अडकणार असल्याची जोरदार चर्चा रंगली होती. आता शमी आणि सानियाचा फोटो व्हायरल होताच जोरदार चर्चा रंगली. दरम्यान हा फोटो खरा आहे की खोटा, जाणून घ्या.

व्हायरल फोटो खरा की खोटा?

सानिया मिर्झा आणि मोहम्मद शमी हे दोघेही विवाह बंधनात अडकणार असल्याची जोरदार चर्चा सुरु होती. दरम्यान सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होतोय, ज्यात दोघेही ख्रिसमसच्या गेटअपमध्ये असल्याचं दिसून येत आहे.

दोघेही दुबईतील एका बिचवर असल्याचं दिसून येत आहे. व्हायरल फोटोवर कॅप्शनही देण्यात आलं आहे. ज्यावर,' Lovely picture of mohammed shami and sania mirza in dubai'असं लिहिलं आहे. आता नेटकऱ्यांना हा फोटो खराखूरा वाटत असून त्यांनी हा फोटो फॉरवर्ड करायला सुरुवात केली आहे.

व्हायरल होत असलेला फोटो खोटा

शमी आणि सानिया मिर्झा यांचा व्हायरल होत असलेला फोटो खरा नसून खोटा आहे. हा फोटो AI चा वापर करुन तयार करण्यात आला आहे. हा फोटो सुरुवातीला २३ डिसेंबर २०२४ ला शेअर करण्यात आला होता.

त्यानंतर इतरांनी हा फोटो व्हायरल करायला सुरुवात केली. फॅक्टचेक केल्यानंतर असं समोर आलंय की, हा फोटो डिपफेकचा वापर करुन तयार करण्यात आला आहे.

सानिया मिर्झा आणि मोहम्मद शमी यांची चर्चा होणं हे काही नवीन नाही. यापूर्वी जुलै महिन्यात दोघे विवाह बंधनात अडकणार असल्याची चर्चा रंगली होती. त्यानंतर शमीने एका कार्यक्रमात बोलताना याबाबत खुलासा केला होता. या पूर्णपणे अफवा असल्याचं शमीने सांगितलं होतं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT