Eoin Morgan Saam Tv
क्रीडा

Eoin Morgan Retirement :इंग्लंड संघाला पहिल्यांदा वर्ल्डकप जिंकून देणाऱ्या 'कूल' कॅप्टनचा क्रिकेटला रामराम

Saam TV News

Eoin Morgan Retirement : इंग्लंड संघाला २०१९ विश्वचषक जिंकवून देणाऱ्या कर्णधार ओएन मॉर्गनने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे . त्याने ट्विट करत ही माहिती दिली आहे. तसेच त्याने आपल्या मित्रांचे, कुटुंबातील सदस्यांचे, सहखेळाडूंचे आणि प्रशिक्षकाचे आभार मानले आहे.

इंग्लंडमध्ये झालेल्या २०१९ वनडे विश्वचषक स्पर्धेत त्याने मोलाची भूमिका बजावत इंग्लंड संघाला पहिला विश्वचषक जिंकून दिला होता. तसेच त्याने तीनही फॉरमॅटमध्ये इंग्लंड संघाला (England Cricket Team)मोलाचे योगदान दिले आहे.

आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत त्याने १०,८५८ धावा केल्या. यादरम्यान त्याने १६ शतके आणि ६४ अर्धशतके झळकावली आहेत. यापूर्वी २७ जून २०२२ रोजी त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला होता. दरम्यान आता तो सर्वच प्रकारच्या क्रिकेट फॉरमॅटमधून निवृत्त झाला आहे. आता तो समालोचन करताना दिसून येऊ शकतो . (Latest Sports Updates)

अशी राहिली कारकीर्द..

अनेकांना ही बाब माहित नसावी,इंग्लंड संघासाठी खेळण्यापूर्वी ओएन मॉर्गनने आयर्लंड संघासाठी पदार्पण केले होते. २००६ मध्ये त्याला पहिल्यांदा इंग्लंडची जर्सी घालून मैदानात उतरण्याची संधी मिळाली. त्याने इंग्लंड संघासाठी २४८ वनडे सामन्यांमध्ये ३९.३ च्या सरासरीने ८४४७ धावा केल्या. यादरम्यान त्याने १४ शतके आणि ४७ अर्धशतके झळकावली.

तसेच २००९ मध्ये त्याला इंग्लंडच्या टी-२०संघात पदार्पण करण्याची संधी मिळाली. त्याने इंग्लंड संघासाठी खेळताना , ११५ टी-२० सामन्यांमध्ये २८.६ च्या सरासरीने १८०५ धावा केल्या. तर कसोटी क्रिकेटमधील १६ सामन्यांमध्ये त्याने ३०.४ च्या सरासरीने १२७८ धावा केल्या. यादरम्यान त्याने २ शतके देखील झळकावली आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: सोलापूरकरांनी कोणाला दिला कौल? विजयाची वैशिष्ट्ये काय?

Sujay Vikhe Patil : जिल्ह्यात सत्तेचा माज करणाऱ्यांचा कार्यक्रम लावला; संगमनेरमधील विजयानंतर सुजय विखे यांचा थोरातांवर निशाणा

Maharashtra Assembly Election Result: तुमचा आमदार कोण? २८८ मतदारसंघातील विजयी उमेदवारांची यादी पाहा

Aaditya Thackeray: दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ; वरळीतून आदित्य ठाकरे दुसऱ्यांदा आमदार

मनसेला आणखी एक धक्का, शिवडीत बाळा नांदगावकरांचा पराभव

SCROLL FOR NEXT