phil salt with jonny bairstow twitter
Sports

ENG vs WI, Highlights: फिल 'सॉल्ट'ने बिघडवली विंडिजची चव! इंग्लंडच्या एकतर्फी विजयानं विजयरथ रोखला

England vs West Indies, Highlights: इंग्लंडने वेस्टइंडिजविरुद्ध झालेल्या सामन्यात शानदार विजय मिळवला आहे. यासह वेस्टइंडियजचा विजयरथ रोखला आहे.

Ankush Dhavre

आयसीसी टी -२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेतील सुपर ८ फेरीतील सामन्यांना प्रारंभ झाला आहे. वेस्टइंडिज विरुद्ध इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये झालेल्या सामन्यात इंग्लंडने वेस्टइंडिजवर शानदार विजय मिळवला आहे. यासह वेस्टइंडिजचा विजयरथ रोखला आहे. या लढतीत इंग्लंडने ८ गडी राखून बाजी मारली आहे. इंग्लंडच्या विजयात फिल सॉल्टने मिठाचा खडा टाकला. त्याने अवघ्या ४७ चेंडूंचा सामना करत ७ चौकार आणि ५ षटकारांच्या मदतीने नाबाद ८७ धावांची खेळी केली.

या स्पर्धेतील ४२ वा सामना सेंट लुसियातील डॅरेन सॅमी नॅशनल क्रिकेट स्टेडियममध्ये पार पडला. या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय योग्य ठरवत इंग्लंडने बलाढ्य वेस्टइंडिजला २० षटकअखेर ४ गडी बाद १८० धावांवर रोखलं. वेस्टइंडिजकडून फलंदाजी करताना जॉन्सन चार्ल्सने ३४ चेंडूंचा सामना करत ४ चौकार आणि १ षटकाराच्या साहाय्याने ३८ धावांची खेळी केली.

या धावांचा पाठलाग करताना इंग्लंडने १७.३ षटकात दिलेलं आव्हान पूर्ण केलं. या सामन्यात सुरुवातीपासूनच इंग्लंडने सामन्यावर पकड बनवून ठेवली होती आणि शेवटही तितकाच शानदार केला.

इंग्लंडला हा सामना जिंकण्यासाठी १८१ धावांची गरज होती. या धावांचा पाठलाग करताना कर्णधार जोस बटलर आणि फिल सॉल्टने शानदार सुरु करुन दिली होती. दोघांनी पहिल्या विकेटसाठी ६७ धावा जोडल्या. बटलर २२ चेंडूंचा सामना करत २५ धावा करत माघारी परतला. त्यानंतर मोईन अली १३ धावा करत माघारी परतला.

इथून पुढे इंग्लंडने एकही विकेट गमावला नाही. जॉनी बेअरस्टो आण फिल सॉल्टने मिळून इंग्लंडची नाव किनाऱ्यावर पोहोचवली. दोघांनी मिळून ४४ चेंडूंमध्ये नाबाद ९७ धावांची भागीदारी केली. सॉल्टने शेवटी ५ षटकार आणि ७ चौकारांच्या मदतीने नाबाद ८७ धावा केल्या. तर बेअरस्टोने २ षटकार आणि ५ चौकारांच्या मदतीने नाबाद ४८ धावांची खेळी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: अष्टविनायक महामार्गावर कवठे गावाजवळ ट्रक आणि दुध गाडीचा भीषण अपघात, तिघांचा मृत्यू

मुंबईत पोलीस कर्मचाऱ्याची आत्महत्या; राहत्या घरात गळफास घेत आयुष्य संपवलं

Crime : प्रेमा तुझा रंग कसा? एक्स गर्लफ्रेंडला ९ वेळा चाकूने भोसकलं, नंतर बॉयफ्रेंडने स्वत: आयुष्य संपवलं

Mumbai : सतत डोअरबेल वाजवल्याने सटकली, तरुणाने डिलिव्हरी बॉयवर केला गोळीबार; मुंबईत थरार

Rajesh Khanna: गळ्यात मंगळसूत्र, कपाळावर कुंकू; राजेश खन्ना यांनी या अभिनेत्रीसोबत केलं गुपचुप लग्न, अनेक वर्षांनंतर केला खुलासा

SCROLL FOR NEXT