England vs India Rishabh Pant century Rahul Dravid celebration video SAAM TV
क्रीडा

Video Viral: रिषभ पंतनं ठोकलं शतक, राहुल द्रविडचं 'बाहुबली' स्टाइल सेलिब्रेशन, पाहा!

एरवी शांत स्वभावाच्या राहुल द्रविडचा असा आक्रमक अवतार कधीही पाहिला नसेल. पाहा हा दमदार व्हिडिओ

Nandkumar Joshi

मुंबई: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचव्या कसोटीच्या पहिल्या दिवशी एजबेस्टनच्या मैदानावर टीम इंडियाचा स्फोटक फलंदाज आणि विकेटकीपर रिषभ पंत (Rishabh Pant) हा 'वन मॅन शो' ठरला. पंतनं १११ चेंडूंमध्ये १४६ धावा कुटल्या. पंतच्या धडाकेबाज शतकानंतर प्रशिक्षक राहुल द्रविडनं जबरदस्त सेलिब्रेशन केलं. त्याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

पावसामुळं काही वेळ व्यत्यय आलेल्या पहिल्या कसोटीच्या (England vs India Test) पहिल्याच दिवशी रिषभ पंतनं इंग्लंडच्या गोलंदाजांची धुलाई केली. त्याने आपल्या इनिंगमध्ये २० चौकार आणि चार षटकार ठोकले.

इंग्लंडचा (England) कर्णधार बेन स्टोक्स याने टॉस जिंकून टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. दिवसाच्या सुरुवातीलाच जेम्स अँडरसनसह इतर गोलंदाजांनी खोचक मारा करून भारतीय फलंदाजीला जेरीस आणले.

१०० धावांच्या आतच भारताचा अर्धा संघ तंबूत धाडला. स्टोक्सचा प्रथम गोलंदाजीचा निर्णय सार्थ ठरवला. मात्र, दुसऱ्या आणि तिसऱ्या सत्रात संपूर्ण चित्र बदललं. दिवसाचा खेळ संपला त्यावेळी भारतानं ७ विकेट गमावून ३३८ धावा केल्या. रवींद्र जडेजाने ८५ धावा केल्या असून, तो नाबाद आहे. तर त्याच्यासोबत मोहम्मद शामी हा खिंड लढवतो आहे.

पंतने चार वर्षांपूर्वी इंग्लंड दौऱ्यावर ओव्हलच्या मैदानावरच आपलं पहिलं कसोटी शतक झळकावलं होतं. त्याने आतापर्यंत पाच शतके ठोकली आहेत. त्यातील चार शतके ही विदेशातील मैदानांवर आहेत. पंतने सिडनीमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध नाबाद १५९ धावा, अहमदाबादमध्ये इंग्लंडविरुद्ध १०१ धावा, याच वर्षी दक्षिण आफ्रिकेत नाबाद १०० धावा आणि त्यानंतर एजबेस्टनमध्ये १४६ धावांची तुफानी खेळी केली.

विशेष म्हणजे पंतने संघाला गरज असतानाच, मालिकेच्या शेवटच्या सामन्यात ही शतके केली आहेत. निर्णायक सामन्यांमध्ये पंत हा चांगली फलंदाजी करत आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये कोणत्याही क्षणी चित्र बदलून टाकणारा फलंदाज म्हणून रिषभ नावारुपाला येत आहे.

पंतच्या शतकानंतर राहुल द्रविडचं बाहुबली स्टाइल सेलिब्रेशन

भारतीय संघ इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत २-१ ने आघाडीवर आहे. मालिका जिंकण्यासाठी टीम इंडियाला या कसोटीमध्ये विजय किंवा केवळ ही कसोटी अनिर्णित राखण्याची गरज आहे. भारतानं इंग्लंडमध्ये २००७ मध्ये कसोटी मालिका १-० ने जिंकली होती. त्यावेळी राहुल द्रविड (Rahul Dravid) टीम इंडियाचा कर्णधार होता. आता यावेळी मात्र, द्रविड प्रशिक्षकाच्या भूमिकेत आहे.

एक वेळ अशी होती की, भारताने १०० धावांच्या आतच पाच फलंदाज गमावले होते. संघ संकटात असतानाच, पंत आणि जडेजानं डाव सावरला. त्यांनी जवळपास सहा धावांच्या सरासरीने २२२ धावांची भागीदारी रचली.

पंतच्या शतकानंतर राहुल द्रविडने जबरदस्त सेलिब्रेशन केलं. ड्रेसिंग रुममध्येही खेळाडूंसोबत जल्लोष केला. याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एरवी शांत असलेला द्रविड यावेळी मात्र 'बाहुबली' बनला होता, अशा प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्यक्त होत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Election: महायुतीनं केलंय काम भारी! लाडक्या बहिणींना मिळणार २१०० रुपये, कोल्हापुरात महायुतीची १० वचनं

Maharashtra News Live Updates: भाजपचा मनसेचे उमेदवार बाळा नांदगावकर यांना पाठिंबा

Uddhav Thackeray: पीएम मोदींच्या अशुभ हातांनी बांधलेला पुतळा पडला'; उद्धव ठाकरेंची टीका

Bullet Train Bridge Collapsed: बुलेट ट्रेन प्रकल्पाचा निर्माणाधीन पूल कोसळला; अनेक कामगार मलब्याखाली दबले

Assembly Election: मनोज जरांगे पाटलांनी रयतेतल्या मराठ्यांचा बळी दिला: प्रकाश आंबेडकर

SCROLL FOR NEXT