england cricket team saam tv news
Sports

IND vs ENG: टीम इंडियाला हरवण्यासाठी इंग्लंडचा खास प्लान! या ११ खेळाडूंसह उतरणार मैदानात

England Playing 11 Prediction: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिला कसोटी सामना सुरु व्हायला अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका रंगणार आहे

Ankush Dhavre

England Playing XI Prediction For IND vs ENG 1st Test:

भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिला कसोटी सामना सुरु व्हायला अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका रंगणार आहे. मालिकेतील पहिला कसोटी सामना २५ जानेवारीपासून २५ जानेवारीपासून हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडियमवर रंगणार आहे.

इंग्लंडला २०१२ पासून भारतात कसोटी मालिका जिंकता आलेली नाही. त्यामुळे यावेळी इंग्लंडचा संघ भारतीय संघाला पराभूत करण्यासाठी आणखी जोर लावताना दिसून येऊ शकतो. पहिल्या कसोटीत इंग्लंडचा संघ ३ फिरकी आणि २ वेगवान गोलंदाजांसह मैदानात उतरु शकतो.

भारतात खेळताना फिरकी गोलंदाजांना मदत मिळते. त्यामुळे इंग्लंडच्या संघात ३ फिरकी गोलंदाजांना संधी दिली जाऊ शकते. आता हे ३ गोलंदाज कोण असतील?असा प्रश्न उपस्थित होतो.तर रेहान अहमद, जॅक लीच आणि टॉम हार्टले या फिरकी गोलंदाजांना या सामन्यासाठी भारतीय संघात संधी दिली जाऊ शकते. टॉम हार्टलेला या सामन्यात पदार्पण करण्याची संधी दिली जाऊ शकते.

टॉम हार्टलेच्या रेकॉर्डबद्दल बोलायचं झालं तर त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमधील २० सामन्यांमध्ये ३६.५७ च्या सरासरीने ४० गडी बाद केले आहेत. यापूर्वी शोएब बशीरचा संघात समावेश केला जाणार अशी चर्चा सुरु होती. मात्र त्याला व्हिजा मिळालेला नाही. त्यामुळे तो या सामन्याला मुकण्याची शक्यता आहे. तो दुसऱ्या कसोटीत खेळताना दिसून येऊ शकतोय. (Latest cricket news in marathi)

या वेगवान गोलंदाजांना मिळू शकते संधी..

या सामन्यासाठी वेगवान गोलंदाज म्हणून अनुभवी गोलंदाज जेम्स अँडरसन आणि मार्क वुडला संघात स्थान दिलं जाऊ शकतं. वुडने अॅशेस मालिकेत दमदार खेळ केला होता. त्याने ३ सामन्यांमध्ये १४ गडी बाद केले होते. तर यष्टीरक्षक फलंदाज बेन फोक्सला संघात स्थान दिले जाऊ शकते. तर जॉनी बेयरस्टो पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी येऊ शकतो.

या सामन्यासाठी अशी असू शकते इंग्लंडची प्लेइंग ११:

बेन स्टोक्स (कर्णधार), जॅक क्राउली, बेन डकेट, जो रूट, ओली पोप, रेहान अहमद, जॅक लीच, टॉम हार्टेले, मार्क वुड, जेम्स अँडरसन,बेन फोक्स

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nagpur : पिकांच्या संरक्षणासाठी तारेत सोडला विद्युत प्रवाह; चारा कापताना झाला घात, विजेच्या धक्क्याने एकाचा मृत्यू

Aamhi Saare Khavayye : खुशखबर! मराठी कुकिंग शो 'आम्ही सारे खवय्ये' येतोय? पाहा VIDEO

Rave Party: रेव्ह पार्टी म्हणजे नेमकं काय?

Maharashtra Live News Update: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये कार्यकर्त्यांची इच्छा - नितेश राणे

Masala Gobi Recipe : कोबीच्या भाजीला द्या खास ट्विस्ट, मुलं ५ मिनिटांत फस्त करतील टिफिन

SCROLL FOR NEXT