Josh Baker Death Yandex
Sports

Josh Baker Death: धक्कादायक! २० वर्षीय क्रिकेटपटूचं निधन, क्रीडाविश्वात शोककळा

England Cricketer Josh Baker Death: वूस्टरशायरचा फिरकी गोलंदाज जोश बेकर याचं वयाच्या 20 व्या वर्षी निधन झालं आहे. या बातमीने क्रीडा जगताला शोककळा पसरली आहे.

Rohini Gudaghe

क्रिकेटप्रेमींसाठी मोठी बातमी आहे. वूस्टरशायरचा फिरकी गोलंदाज जोश बेकर याचं वयाच्या 20 व्या वर्षी निधन झालं आहे. या बातमीने क्रीडा जगताला शोककळा पसरली आहे. 19 एप्रिल रोजी जोश बेकरने ( Josh Baker Death) अखेरचा सामना खेळला होता. यंदाच्या हंगामात जोश बेकरने दोन काउंटी सामन्यांमध्ये शानदार कामगिरी केली होती. 19 एप्रिल रोजी किडरमिन्स्टरमध्ये तो डरहमविरुद्ध खेळताना दिसला होता.

जोश बेकरने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. 2021 पासून त्याच्या कारकिर्दीला सुरूवात झाली होती. आतापर्यंत जोश बेकरने 47 सामने खेळले होते. यामध्ये जोशने शानदार कामगिरी करत 70 विकेट त्याच्या नावावर केल्या (England Cricketer Josh Baker) होता. इंग्लंडकडून जोश बेकर अंडर-19 खेळला होता. जोश बेकरचा मृत्यू नेमका कोणत्या कारणामुळे झाला, याबाबत अजून सस्पेंस आहे. जोश बेकरच्या मृत्यूची वूस्टरशर क्लबने माहिती दिलीय, परंतु मृत्यू कशामुळे झाला, हे उघड केलेलं नाही.

गुरुवारी वूस्टरशायरने जोश बेकरच्या मृत्यूची माहिती दिलीय. मात्र कुटुंबाची गोपनीयता लक्षात घेऊन त्यांनी मृत्यूचं कारण सांगितलेलं नाही. वूस्टरशायरचे मुख्य कार्यकारी ॲशले जाईल्स म्हणाले (England Cricketer Josh Baker Death) की, 'जोशच्या निधनाने आम्हा सर्वांना धक्का बसला आहे. जोश हा केवळ संघातील खेळाडू नव्हता. तर तो आमच्या क्रिकेट परिवाराचा महत्त्वाचा हिस्सा होता. आम्हाला त्याची खूप आठवण येईल.

प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये दोन अर्धशतकेही झळकावली ( (England Cricketer Death) आहेत. जोश बेकरने 22 प्रथम श्रेणी, 17 लिस्ट ए आणि 8 टी-20 सामने खेळले आहेत. 16 मे रोजी जोश त्याचा एकविसावा वाढदिवस साजरा करणार होता. जोश बेकरचा त्याच्या वाढदिवसाच्या अवघ्या 14 दिवस आधी मृत्यू झाला. जोश बेकरच्या मृत्यूने चाहते हळहळ व्यक्त करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anant Chaturdashi 2025 live updates : पुण्यात विसर्जनासाठी गेलेले ४ जणांचा पाण्यात बुडून मृत्यू

Ganesh visarjan 2025 : गणपतीचे विसर्जन करताना विपरीत घडलं, तीन तरुण पाण्यात वाहून गेले

Pune News: पुण्यात दगडूशेठ गणपतीची महाआरती पाहा VIDEO

ITR Filing : टॅक्स रिफंड परताव्याचा फॉर्म अडकून पडलाय? मग 'या' गोष्टी एकदा तपासाच

Akola Accident: गणेश विसर्जन करून परताना भक्तांवर काळाचा घाला; तरुणाचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT