इंग्लंडने युएफा युरो २०२४ स्पर्धेतील फायनलमध्ये धडक दिली आहे. स्पर्धेतील सेमिफायनलमध्ये इंग्लंड आणि नेदरलँड हे दोन्ही संघ आामने सामने आले होते. या सामन्यात इंग्लंडने २-१ ने बाजी मारली आणि फायनलचं तिकीट मिळवलं. या रोमांचक सामन्यात इंग्लंडला हवी तशी सुरुवात करता आली नव्हती. नेदरलँडकडून खेळताना जावी सिमंसने पहिला गोल केला आणि इंग्लंडला बॅकफूटवर ढकललं. मात्र त्यानंतर इंग्लंडने दमदार कमबॅक केलं.
सामन्यातील सुरुवातीच्या काही मिनिटांमध्ये इंग्लंडचा संघ सामन्यात मागे होता. मात्र इंग्लंडचा कर्णधार हॅरी केनने गोल करत १-१ ची बरोबरी करुन दिली. त्यानंतर शेवटपर्यंत दोन्ही संघातील खेळाडूंना गोल करता आला नाही. शेवटी सामन्यात एक्स्ट्रा टाईम देण्यात आला. याचा फायदा घेत इंग्लंजने २-१ ने बाजी मारली.
स्पर्धेतील फायनलमध्ये इंग्लंड आणि स्पेन हे दोन्ही संघ आमनेसामने येणार आहेत. सेमिफायनलच्या सामन्यात स्पेनने फ्रान्सला धुळ चारत फायनलमध्ये प्रवेश केला. स्पेनने या संपूर्ण स्पर्धेत दमदार कामगिरी केली. यासह स्पेनचा संघ या स्पर्धेच्या इतिहासात सलग ६ सामने जिंकणारा पहिलाच संघ ठरला आहे. इंग्लंडने १९६६ नंतर इंग्लंडला कुठलीही मोठी ट्रॉफी जिंकता आलेली नाही. त्यामुळे इंग्लंडकडे ५८ वर्षांचा दुष्काळ संपवून फायनलची ट्रॉफी उंचावण्याची संधी असणार आहे.
या स्पर्धेतील फायनलचा सामना १४ जुलै रोजी होणार आहे. हा सामना स्थानिक वेळेनुसार, ९ वाजता सुरु होईल. तर भारतीय वेळेनुसार हा सामना १५ जुलै रोजी मध्यरात्री १२:३० वाजता प्रक्षेपित केला जाईल.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.