टी -२० वर्ल्डकप स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानचा संघ इंग्लंड दौऱ्यावर आहे. दोन्ही संघामध्ये टी -२० मालिकेला प्रारंभ झाला आहे. या मालिकेतील दुसऱ्या टी -२० सामन्यात जोस बटलरने इतिहास रचला आहे. या सामन्यात डावाची सुरुवात करताना त्याने ५१ चेंडूंचा सामना करत ८४ धावांची तुफानी खेळी केली. या खेळीच्या बळावर त्याने संघाची धावसंख्या २० षटक अखेर ७ गडी बाद १९३ धावांवर पोहचवली. या अर्धशतकी खेळीसह त्याने मोठा रेकॉर्ड मोडून काढला आहे.
जोस बटलरने टी -२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ३००० धावा पूर्ण केल्या आहेत. असा कारनामा करणारा तो इंग्लंडचा पहिलाच फलंदाज ठरला आहे. बटलरने हा कारनामा ११६ व्या सामन्यात करून दाखवला आहे. असा कारनामा करणारा तो इंग्लंडचा पहिलाच तर जगातील ९ वा फलंदाज ठरला आहे. यापूर्वी विराट कोहली, बाबर आझम, रोहित शर्मा, पॉल स्टर्लिंग, मोहम्मद रिजवान, आरोन फिंच, डेव्हिड वॉर्नर आणि मार्टिन गप्टीलने हा कारनामा करून दाखवला आहे.
जोस बटलर हा टी -२० क्रिकेटमधील विस्फोटक फलंदाजांपैकी एक आहे. त्याने ११५ सामन्यातील ११६ डावात ३०११ धावा केल्या आहेत. या धावा त्याने ३५.४२ च्या सरासरीने आणि १४५.१० च्या स्ट्राइक रेटने केल्या आहेत. यादरम्यान त्याने १ शतक आणि २३ अर्धशतक झळकावले आहेत. नाबाद १०१ धावा ही त्याची सर्वोत्तम खेळी आहे.
तसेच या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, ४ टी -२० सामन्यांच्या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने २० षटक अखेर ७ गडी बाद १८३ धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना पाकिस्तानचा डाव १६० धावांवर आटोपला. इंग्लंडने हा सामना २३ धावांनी आपल्या नावावर केला.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.