Jos Buttler,ENG vs PAK: टी-२० वर्ल्डकपआधी इंग्लंडला मोठा धक्का! महत्वाच्या मालिकेतून जोस बटलर बाहेर

Jos Buttler News In Marathi: आगामी टी-२० वर्ल्डकप स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर इंग्लंडचे खेळाडू आयपीएल सोडून मायदेशी परतले आहेत. ज्यात राजस्थान रॉयल्स संघाचा विस्फोटक फलंदाज जोस बटलरचाही समावेश आहे.
Jos Buttler,ENG vs PAK: टी-२० वर्ल्डकपआधी इंग्लंडला मोठा धक्का! महत्वाच्या मालिकेतून जोस बटलर बाहेर
big blow for england jos buttler may miss few matches of england vs pakistan t20i series cricket news in marathi amd2000twitter

आगामी टी-२० वर्ल्डकप स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर इंग्लंडचे खेळाडू आयपीएल सोडून मायदेशी परतले आहेत. ज्यात राजस्थान रॉयल्स संघाचा विस्फोटक फलंदाज जोस बटलरचाही समावेश आहे. आयसीसी टी-२० वर्ल्डकप स्पर्धेसाठी जोस बटलरकडे नेतृत्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. ही स्पर्धा तोंडावर असताना क्रिकेट चाहत्यांचं टेन्शन वाढवाणारी बातमी समोर आली आहे.

टी-२० वर्ल्डकप स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर इंग्लंडचा संघ पाकिस्तान संघासोबत टी-२० मालिका खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे. या मालिकेला २२ मे पासून सुरुवात होणार आहे. जोस बटलर वैयक्तिक कारणास्तव या मालिकेतील काही सामने किंवा संपूर्ण मालिकेतून बाहेर होऊ शकतो. माध्यमातील वृत्तानुसार जोस बटलर या मालिकेतील काही सामने मुकण्याची शक्यता आहे.

Jos Buttler,ENG vs PAK: टी-२० वर्ल्डकपआधी इंग्लंडला मोठा धक्का! महत्वाच्या मालिकेतून जोस बटलर बाहेर
IPL Playoffs, Qualifier 1: पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोणाला मिळणार फायनलचं तिकीट?

जोस बटलर तिसऱ्यांदा बाबा होणार आहे. त्यामुळे आपल्या कुटुंबाला वेळ देण्यासाठी तो काही सामने बाहेर होणार असल्याचं म्हटलं जात आहे. जोस बटलर सध्या तुफान फॉर्ममध्ये आहे. याचा इंग्लंड संघाला मोठा फायदा होणार आहे. परंतु त्याच्या अनुपस्थितीचा इंग्लंडला मोठा धक्का बसू शकतो.

Jos Buttler,ENG vs PAK: टी-२० वर्ल्डकपआधी इंग्लंडला मोठा धक्का! महत्वाच्या मालिकेतून जोस बटलर बाहेर
KKR vs SRH,IPL Playoff: केकेआर नव्हे तर हैदराबादलाच मिळणार फायनलचं तिकीट! चक्रावून टाकणारी आकडेवारी एकदा पाहाच

इंग्लंडविरुद्ध पाकिस्तान संघाचे सामने

इंग्लंड आणि पाकिस्तान या दोन्ही संघांमध्ये ५ टी-२० सामन्यांची मालिका होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना २२ मे रोजी होणार आहे. तर दुसरा सामना २५ मे रोजी , तिसरा सामना २८ मे रोजी आणि मालिकेतील शेवटचा सामना २८ मे रोजी होणार आहे.

टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेसाठी असा आहे इंग्लंडचा संघ..

जोस बटलर (कर्णधार), मोईन अली, जोफ्रा आर्चर, जॉनी बेअरस्टो, हॅरी ब्रूक, सॅम करन, बेन डकेट, टॉम हार्टले,लियाम लिव्हिंगस्टोन, आदिल रशीद, फिल सॉल्ट, रीस टॉपली, मार्क वुड, विल जॅक्स, ख्रिस जॉर्डन.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com