Anshul Kamboj Replaces Arshdeep Singh saam tv
Sports

Eng vs Ind 4th Test: चौथ्या कसोटीपूर्वी टीम इंडियामध्ये मोठा बदल; धाकड गोलंदाजाची संघात एन्ट्री

Anshul Kamboj Replaces Arshdeep Singh: भारत आणि इंग्लंड यांच्यात बुधवारी मँचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर चौथा कसोटी सामना खेळला जाणार आहे.

Bharat Jadhav

मँचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर भारत आणि इंग्लंड यांच्या चौथ्या कसोटी सामना खेळला जाणार आहे. या सामन्याआधी भारतीय संघात मोठा बदल केला जाणार आहे. भारतीय संघाचा डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग दुखापतीमुळे चौथ्या कसोटीतून बाहेर झालाय. त्याच्या जागी नव्या दमाच्या गोलंदाजाला संघात स्थान देण्यात आले आहे.

१७ जुलै रोजी सराव सत्रादरम्यान अर्शदीपला चेंडू अडवताना डाव्या हाताला जखम झाली. त्यानंतर त्याला तात्काळ उपचार देण्यात आले, हाताला पट्टी बांधण्यात आली. अर्शदीपच्या हाताला टाकेही घालण्यात आले आहेत, त्यामुळे तो चौथ्या कसोटी सामन्यापर्यंत तंदुरुस्त होणार नाहीये. बीसीसीआयच्या सूत्रांनुसार, अर्शदीपला पूर्णपणे तंदुरुस्त होण्यासाठी किमान 10 दिवस लागतील.

अर्शदीपच्या जागी हरियाणाचा वेगवान गोलंदाज अंशुल कंबोजला भारतीय संघात स्थान देण्यात आलंय. अंशुल २४ वर्षाचा असून त्याने भारत-A संघाकडून इंग्लंड लॉयन्सविरुद्ध दोन फर्स्ट क्लास सामने खेळलेत. आपल्या वेग व अचूक लाइन-लेंथमुळे निवड समितीच्या सदस्याना त्याने प्रभावित केलंय. त्याने दोन तीन दिवसांचे सामने खेळलेत दोन सामन्यांमध्ये त्याने पाच विकेट्सही घेतल्या. दुसऱ्या सामन्याच्या दुसऱ्या डावात कंबोजने फलंदाजीत कमाल दाखवली त्याने ५१ धावा केल्या.

हरियाणासाठी अंशुल कंबोजने २४ प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये ७९ विकेट्स घेतल्या आहेत. कंबोज लवकरच इंग्लंडला पोहोचून टीम इंडियामध्ये सहभागी होणार आहे. बीसीसीआयच्या सूत्रांनी सांगितले आहे की, अर्शदीपला खोल दुखापत झाली आहे आणि त्याच्या पायांनाही दुखापत झाली आहे. त्याला तंदुरुस्त होण्यासाठी किमान १० दिवस लागतील. निवडकर्त्यांनी कंबोजला संघात समाविष्ट करण्याचा निर्णय घेतलाय.

असा असेल भारतीय संघ

शुभमन गिल (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, के.एल. राहुल, साई सुदर्शन, ऋषभ पंत (उपकर्णधार/यष्टीरक्षक), नीतीश रेड्डी, रवींद्र जडेजा, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), करुण नायर, अभिमन्यू ईश्वरन, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, वॉशिंग्टन सुंदर, आकाश दीप, अंशुल कंबोज, कुलदीप यादव.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Friday Horoscope : ५ राशींच्या लोकांच्या मागे कटकटीची पीडा; आर्थिक ताण वाढणार, जाणून घ्या शुक्रवारचा दिवस कसा असणार?

Todays Horoscope: 'या' राशींसाठी सोप्या गोष्टी अवघड होऊ शकतात, पाहा राशीभविष्य

Mumbai Local Train: मुंबई लोकलचा ४ दिवस रेल्वे ब्लॉक, अनेक ट्रेन रद्द, जाणून घ्या वेळापत्रक

Ganeshotsav: पुण्यात आता ‘नो लिमिट’, विसर्जन मिरवणुकीत होणार ढोल-ताशांचा जल्लोष, पथकांवरची सक्ती हटली

Friday Horoscope : कामाच्या ठिकाणी धावपळ होणार; 3 राशींच्या लोकांना आव्हाने पेलावे लागणार

SCROLL FOR NEXT