Hardik Pnadya Breakup : हार्दिक पांड्याचं पुन्हा ब्रेकअप, घटस्फोटानंतर कुणासोबत होतं अफेअर?

Hardik Pandya Girlfriend : हार्दिक पांड्या आणि जास्मिन वालिया यांनी सोशल मीडियावर एकमेकांना अनफॉलो केल्याने त्यांच्या ब्रेकअपच्या चर्चा जोरात रंगल्या आहेत. याआधी दोघांचे ग्रीस व्हेकेशन फोटो चर्चेत होते.
Hardik Pnadya Breakup
Hardik Pnadya BreakupSaam Tv
Published On

हार्दिक पांड्याने माजी पत्नी नताशा स्टॅनकोविचपासून घटस्फोट घेतल्यानंतर त्याचं नाव आणि जास्मिन वालिया जोडले जात होते. हे जोडपं अनेक महिन्यांपासून डेट करत असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. परंतु आता हार्दिक पांड्या आणि जास्मिन वालिया या दोघांनी सोशल मीडियावर एकमेकांना अनफॉलो केले आहे, त्यानंतर हार्दिक पांड्याचं पुन्हा ब्रेकप झाल्याचं म्हटलं जात आहे.

चॅम्पियन्स ट्रॉफी दरम्यान, जास्मिन वालिया स्टेडियममध्ये सामना पाहताना दिसली होती, त्यानंतर तीचे नाव सतत भारतीय क्रिकेटपटू हार्दिक पांड्याशी जोडले जात होते. जास्मिन अनेकदा हार्दिकच्या क्रिकेट सामन्यादरम्यान सुद्धा दिसली होती तसेच ती मुंबई इंडियन्स टीम बसमध्येही स्पॉट झाली होती.

Hardik Pnadya Breakup
Hardik Pandya : 7,00,00,000 रुपयांचे महागडे घड्याळ घालून मैदानात उतरला हार्दिक पंड्या, सोशल मीडियावर फोटो व्हायरल

त्यांचे ग्रीस व्हेकेशनचे फोटो सोशल मीडियावर लीक झाल्यापासून त्यांच्या डेटिंगची चर्चा तीव्र झाली होती. त्यानंतर हार्दिक आणि जास्मिन यांनी इंस्टाग्रामवर एकमेकांना अनफॉलो केलं असून अद्याप कोणत्याही डेटिंगच्या बातम्यांना समर्थन दिलेलं नाही. आणि आता त्यांनी ब्रेकअपच्या चर्चेवरसुद्धा कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. दरम्यान आता हार्दिक आणि जास्मिन यांचे खरचं प्रेमाचे धागे जुळले होते का ? शिवाय त्यांचा खरचं ब्रेकअप झाला आहे का ? हे अद्यापही अनुत्तरित आहे.

Hardik Pnadya Breakup
Hardik Pandya Natasa Divorce: हार्दिकच्या प्रयत्नाने नातं वाचलं...; घटस्फोटांच्या चर्चांवर नताशाचा धक्कादायक खुलासा, म्हणाली, हार्दिक सुधारला असता...!

कोण आहे जास्मिन वालिया ?

जास्मिन वालिया ही एक ब्रिटिश गायिका आणि मॉडेल आहे. तिचा जन्म इंग्लंडमध्ये झाला असून तिचे पालक भारतीय वंशाचे आहेत. तिने 'द ओन्ली वे इज एसेक्स' (TOWIE) या ब्रिटिश रिअ‍ॅलिटी टीव्ही मालिकेत भाग घेतला. या शोमध्ये भाग घेतल्यानंतर जास्मिनला लोकप्रियता मिळाली. तिने २०१० मध्ये या शोमध्ये कलाकार म्हणून सुरुवात केली आणि फार कमी कालावधीत तिने चाहत्यांचं मन जिंकलं. या लोकप्रिय रिअ‍ॅलिटी शोमधील तिच्या उपस्थितीमुळे तिला मनोरंजन क्षेत्रात ओळख निर्माण करण्यास मदत झाली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com