India vs West Indies Match Weather Forecast saam tv
Sports

T20 World Cup: रविवारी ईडन गार्डन्सवर पावसाची शक्यता? पाहा IND vs WI सामन्यापूर्वी कोलकात्याचं हवामान अपडेट

India vs West Indies Match Weather Forecast: भारतासाठी १ मार्च रोजी वेस्ट इंडिजविरुद्ध करो या मरो सामना असणार आहे. सेमीफायनल पात्रतेचं गणित, हवामान अपडेट आणि सामना रद्द झाल्यास काय होईल हे पाहूयात.

Surabhi Jayashree Jagdish

झिम्बाव्बेला हरवल्यानंतर भारतासमोर टी-२० वर्ल्डकपची सेमीफायनल गाठण्याचं आता एक सोप्पं समीकरण समोर आहे. गुरुवारी झालेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने वेस्ट इंडिजचा ९ विकेट्सने पराभव केला. त्यामुळे आता सेमीफायनलचं गणित पूर्णपणे स्पष्ट झालंय. आता भारताला सेमीफायनलचं तिकीट मिळवण्यासाठी कोणत्याही परिस्थितीत वेस्ट इंडिजचा पराभव करावा लागणार आहे.

परवा म्हणजेच १ मार्च रोजी रविवारी कोलकाता इडन्स गार्डन्सवर भारत विरूद्ध वेस्ट इंडिज यांच्यामध्ये सामना रंगणार आहे. त्यामुळे या सामन्यात जो जिंकेल तो दक्षिण आफ्रिकेसोबत सेमीफायनलसाठी क्वालिफाय करणार आहे.

१ मार्च रोजी होणाऱ्या सामन्यावर टीम इंडियाचं भविष्य अवलंबून आहे. १ मार्च रोजी ईडन गार्डन्सवर होणारा सामना सेमीफायनलमधील दुसरं स्थान निश्चित करणार आहे. यासाठी टीम इंडिया सर्व प्रयत्न करणार आहे. परंतु या सुपरहिट सामन्याची मजा पावसामुळे खराब होण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.

कोलकात्यात हवामान कसं असेल?

बीबीसी हवामान अहवालानुसार, १ मार्च रोजी कोलकातामध्ये पावसाची शक्यता नाही. सामन्यादरम्यान हवामान क्रिकेटसाठी अनुकूल राहणार आहे. याचा अर्थ असा की, १ मार्च रोजी मैदानावर सामना खेळवला जाऊ शकतो.

जर या सामन्यात पाऊस आला तर?

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज सुपर ८ सामना पावसामुळे रद्द झाला तर काय होईल हे देखील जाणून घेऊया. जर रविवारी पाऊस आलाच तर वेस्ट इंडिज थेट सेमीफायनलसाठी पात्र ठरणार आहे. दोन्ही टीम्सचे पॉइंट टेबलवर प्रत्येकी २ पॉईंट् आहेत. मात्र वेस्ट इंडिजचं नेट रन रेट भारतापेक्षा चांगलं. ज्यामुळे ते सेमीफायनलमध्ये पोहोचू शकणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बारावीत अनुत्तीर्ण झालात? काळजी नको! पुरवणी परीक्षेसाठी आजपासून भरा फॉर्म; 'असं' आहे वेळापत्रक

Maharashtra News Live Update : बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठी मंगळवारपासून अर्ज करण्याची सुविधा होणार उपलब्ध

Nasrapur : नसरापूर प्रकरणात संतापजनक खुलासा, आरडाओरडा करू नये म्हणून केलं भयानक कृत्य, वाचून राग अनावर येईल

Riteish-Raja Shivaji Collection : बॉक्स ऑफिसवर रितेशचाच बोलबाला; 'राजा शिवाजी' सोमवारीही हाऊसफुल, बक्कळ कमाई करून बनवला रेकॉर्ड

Bank Rules : तुमच्या अकाउंटमधून पैसे आपोआप कट होतायत? काय आहे बँकेचे नियम, जाणून घ्या

SCROLL FOR NEXT