रवींद्र जडेजा  Twitter/ @imjadeja
Sports

Duleep Trophy 2024 : रवींद्र जडेजा आणि मोहम्मद सिराज बाहेर, कुणाला मिळाली संधी?

Duleep Trophy 2024 : दुलीप ट्रॉफी 2024 स्पर्धेबद्दल मोठी अपडेट समोर आली आहे. रवींद्र जाडेजा आणि मोहम्मद सिराज दुलीप ट्रॉफी स्पर्धेतून बाहेर झाले आहेत.

Namdeo Kumbhar (नामदेव कुंभार)

Duleep Trophy 2024 Siraj Jadeja: दुलीप ट्रॉफी 2024 स्पर्धा ५ सप्टेंबरपासून सुरुवात होत आहे. त्याआधीच मोठी बातमी समोर आली आहे. अष्टपैलू रवींद्र जाडेजा, मोहम्मद सिराज आणि उमरान मलिक पहिल्या टप्प्यातून बाहेर गेले आहेत. बीसीसीआयकडून याबाबतची माहिती देण्यात आली आहे. रवींद्र जाडेजा ब संघाकडून खेळणार होता, त्याला रिलीज करण्यात आलेय. सिराज आणि उमरान मलिक आजारी असल्यामुळे त्यांनाही रिलिज करण्यात आले आहे. नवदीप सैनी आणि गौरव यादव यांना संधी देण्यात आली आहे.

मोहम्मद सिराज याला ब संघात स्थान मिळाले होते. पण आजारी असल्यामुळे तो आता खेळू शकणार नाही, त्याला रिलीज करण्यात आले आहे. सिराजच्या जागी नवदीप सैनी याला स्थान मिळाले आहे. नवदीप सैनी अनुभवी गोलंदाज आहे, त्याना आतापर्यंत शानदार कामगिरी केली आहे. नवदीप टीम अभिमन्यु ईश्वरनच्या नेतृत्वातील ब संघात खेळताना दिसणार आहे. नवदीप सैनीने भारतासाठी आठ वनडे, दोन कसोटी आणि ११ टी२० सामने खेळले आहेत. लिस्ट ए क्रिकेटमध्ये त्याने १०१ विकेट घेतल्या आहेत. तर फर्स्टक्लासमध्ये १८४ विकेट घेतल्या आहेत.

उमरानच्या जागी गौरवला संधी

उमरान मलिक दुलीप ट्रॉफीमध्ये क संघात खेळणार होता, या संघाची धुरा ऋतुराज गायकवाड याच्या खांद्यावर आहे. उमरान मलिक आजारी आहे, त्यामुळे तो स्पर्धेबाहेर गेला आहे. उमरानच्या जागी गौरव यादव याला संधी मिळाली आहे. गौरवने 37 फर्स्ट क्लास सामन्यात 141 विकेट घेतल्या आहेत. लिस्ट एच्या 23 सामन्यात ४८ विकेट घेतल्या आहेत.

दुलीप ट्रॉफी 2024 अपडेटेड टीम -

भारत ब : अभिमन्यु ईश्वरन (कर्णधार), यशस्वी जयसवाल, सरफराज खान, ऋषभ पंत (विकेटकीपर), मुशीर खान, नितीश कुमार रेड्डी*, वाशिंगटन सुंदर, नवदीप सैनी, यश दयाल, मुकेश कुमार, राहुल चाहर, आर साई किशोर, मोहित अवस्थी , एन जगदीसन.

भारत क : ऋतुराज गायकवाड़ (कर्णधार), साई सुदर्शन, रजत पाटीदार, अभिषेक पोरेल (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, बी इंद्रजीत, रितिक शौकीन, मानव सुथार, गौरव यादव, विशाक विजयकुमार, अंशुल खंबोज, हिमांशु चौहान, मयंक मारकंडे, आर्यन जुयाल, संदीप वारियर.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anant Chaturdashi 2025 live updates : अलका टॉकीज चौकात "श्रीमंत" दाखल

Ganesh visarjan 2025 : गणपतीचे विसर्जन करताना विपरीत घडलं, तीन तरुण पाण्यात वाहून गेले

Pune News: पुण्यात दगडूशेठ गणपतीची महाआरती पाहा VIDEO

ITR Filing : टॅक्स रिफंड परताव्याचा फॉर्म अडकून पडलाय? मग 'या' गोष्टी एकदा तपासाच

Akola Accident: गणेश विसर्जन करून परताना भक्तांवर काळाचा घाला; तरुणाचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT