Afc womens asian cup: आशियाई स्पर्धेसाठी तीन भारतीय पंचांची निवड
Afc womens asian cup: आशियाई स्पर्धेसाठी तीन भारतीय पंचांची निवड - Saam TV
क्रीडा | IPL

FIFA World Cup: विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेचा ‘ड्रॉ‘ जाहीर

वृत्तसंस्था

दोहा (कतार) : यंदाच्या विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेचा ‘ड्रॉ‘ शुक्रवारी जाहीर करण्यात आला असून यजमान कतारचा ‘अ‘ गटात समावेश करण्यात आला आहे. विशेष म्हणजे युरोप वगळता इतर खंडातील एकही संघ एकाच गटात नाही. येत्या २१ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या स्पर्धेत कतारची सलामी लढत दोहाच्या उत्तरेला असलेल्या अल खोर येथील अल बयात स्टेडियममध्ये पहिल्याच दिवशी सेनेगलविरुद्ध होईल. (Draw of FIFA World CUP Decalred)

स्पर्धेसाठी ३२ संघाची आठ गटात विभागणी करण्यात आली असून अद्याप तीन संघ पात्र ठरलेले नाही. त्यांच्याही ‘ड्रॉ‘ मध्ये समावेश करण्यात आला. प्रत्येक गटातील दोन अव्वल संघ बाद फेरीसाठी पात्र ठरतील. गतविजेते फ्रान्सचा ‘ड' गटात समावेश असून त्यांची सलामी लढत २२ नोव्हेंबरला स्टेडियम ९७४ येथे युएई, ऑस्ट्रेलिया व पेरू यांच्यापैकी पात्र ठरणाऱ्या एका संघाविरुद्ध होईल.

स्पेन व जर्मनी या दोन माजी विजेत्यांचा ‘इ‘ गटात समावेश करण्यात आला असून स्पेनची सलामी लढत २३ नोव्हेंबरला न्यूझीलंड किंवा कोस्टा रिका यांच्यातून पात्र ठरणाऱ्या संघाविरुद्ध अल थुमामा स्टेडियम येथे व जर्मनीची सलामी २३ लाच जपानविरुद्ध होईल.

गट :
‘अ‘ - कतार, सेनेगल, नेदरलँड, इक्वेडोर
‘ब' - इंग्लंड, इराण, अमेरिका, युक्रेन/स्कॉटलंड/वेल्स
‘क' - अर्जेंटिना, मेक्सिको, पोलंड, सौदी अरेबिया
‘ड' - डेन्मार्क, फ्रान्स, ट्युनिशिया, युएई/ऑस्ट्रेलिया/पेरू
‘इ‘ - स्पेन, जर्मनी, जपान, न्यूझीलंड/कोस्टारिका
‘फ' - क्रोएशिया, बेल्जियम, मोरोक्को, कॅनडा
‘ग' - ब्राझील, स्वित्झर्लंड, सर्बिया, कॅमेरून
‘ह' - पोर्तुगाल, उरुग्वे, दक्षिण कोरिया, घाना.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Poco X6 5G नविन अवतारात लॉन्च झाला, मिळणार जबरदस्त फीचर्स

Farmers Protest: पंजाबमध्ये शेतकऱ्यांचे रेल रोको आंदोलन, 3 दिवस 46 गाड्या रद्द; 100 मार्ग बदलले

Gadchiroli Crime: धक्कादायक! जादूटोणाच्या संशयातून गावकऱ्यांनी महिलेसह दोघांना जिवंत जाळलं

Maharashtra Politics: प्रणितीसह सुशीलकुमार शिंदे भाजपच्या वाटेवर? प्रकाश आंबेडकरांच्या दाव्याने खळबळ

MI vs KKR, IPL 2024: मुंबईचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात! घरच्या मैदानावर मुंबईचा KKR कडून लाजिरवाणा पराभव

SCROLL FOR NEXT