Virat Kohli-Rahul Dravid Emotional Video SAAM TV
Sports

IPL 2025: विराटने मिठी मारताच द्रविडचे डोळे पाणावले; पाहा दोघांमध्ये असं काय घडलं? मात्र दोन दिग्गजांचा भावूक करणारा Video

Virat Kohli-Rahul Dravid Emotional Video: आज दुपारी रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू विरूद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात सामना रंगणार आहे. या सामन्यापूर्वी विराट कोहली आणि राहुल द्रविड यांचा एक व्हिडीओ व्हायरल होतोय.

Surabhi Jayashree Jagdish

आपल्या पुराणांमध्ये आणि शास्त्रांमध्ये गुरुला देवाचा दर्जा देण्यात आलाय. आयपीएल सुरु असून यामध्ये एक व्हिडीओ व्हायरल होतोय. ज्यामध्ये गुरु आणि शिष्याची भेट झाल्याचं दिसतंय. या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये विराट कोहलीनेही राहुल द्रविडला पाहताच त्याच्यासमोर गुडघ्यांवर बसून चर्चा केली.

आयपीएल २०२५ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात आज सामना रंगणार आहे. या सामन्यापूर्वी, आरसीबी स्टार विराट कोहली आणि राजस्थान रॉयल्सचे मुख्य कोच राहुल द्रविड यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ इमोशनल असून चाहत्यांना खूप आवडला आहे.

आयपीएल २०२५ सुरू होण्यापूर्वीच राहुल द्रविड यांच्या पायाला फ्रॅक्चर झालं होतं. त्यानंतर आतापर्यंत द्रविड व्हीलचेअरवर बसलेल दिसला. आरसीबीविरूद्धच्या सामन्यापूर्वी द्रविड व्हीलचेअरवर बसून मैदानात आल्याचं पाहायला मिळालं. त्याला पाहून विराट कोहली त्याच्याजवळ आला आणि गुडघ्यावर बसला.

द्रविडचे डोळे पाणावले

राहुल द्रविडला व्हीलचेअरवर पाहून विराट कोहली धावत त्याच्याजवळ आला. यावेळी द्रविडशी हात मिळवून तो करतो पण नंतर त्याच्या गुडघ्यावर बसला आणि त्यानंतर मिठी मारतो. यानंतर, राहुल द्रविड, विराट कोहली आणि राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसन मैदानावर मजा करताना दिसले. याचवेळी कोहली द्रविडला काहीतरी सांगतो आणि द्रविड इमोशनल होतो. यावेळी द्रविडचे डोळे पाणावलेले असतात.

कोहली-द्रविडचा व्हिडीओ व्हायरल

व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये भारतीय टीमचे माजी फलंदाजीचे कोच विक्रम राठोड देखील दिसतायत. कोहलीही त्याच्यासोबत मजा कररताना दिसतो. एक काळ असा होता जेव्हा या दिग्गजांनी टीम इंडियाला अनेक विजेतेपदं जिंकण्यास मदत केली.

आज रंगणार आरसीबी विरूद्ध राजस्थान

आज म्हणजेच रविवारी १३ एप्रिल रोजी विराट कोहलीची आरसीबी आणि संजू सॅमसनची राजस्थान रॉयल्स एकमेकांशी भिडणार आहे. आज आयपीएलचा डबल हेडर सामना आहे. ज्यामध्ये पहिला सामना दुपारी ३:३० वाजता जयपूरमधील सवाई मानसिंग स्टेडियमवर खेळला जाणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये कार्यकर्त्यांची इच्छा - नितेश राणे

7 minutes after death: मृत्यूनंतर 7 मिनिटांत काय घडतं? पाहा वैज्ञानिक दृष्टीकोनातून समोर आलेल्या धक्कादायक गोष्टी

GK: महिलांनी साष्टांग नमस्कार का टाळावा? काय आहे यामागचं शास्त्रीय कारण

Pune: रेव्ह पार्टीचा 1:42 मिनिटाचा INSIDE VIDEO समोर; २ तरूणी अन् मित्रांसोबत खडसेंचा जावई नशेन धुत

Akola News : लग्नाचं आमिष दाखवतं कॅफेत घेऊन गेला; २९ वर्षीय तरुणाचे ३३ वर्षीय महिलेवर अत्याचार

SCROLL FOR NEXT