Shikhar Dhawan : मला तुझ्यासोबत रहायचंय... शिखर धवनला परदेशी मुलीने घातली साद, व्हिडिओ व्हायरल

Shikhar Dhawan Video : शिखर धवन सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चांगलाच चर्चेत आहे. नुकताच त्याने सोफी शाइनसोबत एक खास व्हिडीओ शेअर केला आहे. जो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
Shikhar Dhawan Video
Shikhar DhawanSAAM TV
Published On

सध्या माजी भारतीय क्रिकेटर शिखर धवन (Shikhar Dhawan) त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चांगलाच चर्चेत आहे. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये एका मुलीसोबत त्याला स्पॉट करण्यात आले. तिचे नाव सोफी शाइन (Sophie Shine ) असे आहे. अलीकडेच ते दोघेही एका मीडिया कॉन्क्लेव्हमध्ये एकत्र दिसले, ज्यामुळे त्यांच्या डेटिंगच्या चर्चा सोशल मीडियावर चांगल्याच रंगल्या आहेत. सध्या त्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडीओत मुलगी शिखरला सांगत आहे की, "मला तुझ्यासोबत रहायचे आहे."

शिखर धवन सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो. अनेक वेळा कॉमेडी व्हिडीओ तो चाहत्यांसोबत शेअर करत असतो. अलिकडेच त्याची सोफी शाइनसोबत एक रील व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये सोफी शिखरला म्हणते की, "मला इथून जायचे मन करत नाही..." त्यावर "का?" असा प्रश्न शिखर करतो. यावर उत्तर देत सोफी म्हणते की, "मला तुझ्या जवळ राहायचे आहे." यावर शिखर म्हणतो की," घरी आई काम करायला लावत असेल..." यानंतर दोघेही हसताना दिसत आहे.

शिखर धवन आणि सोफी शाइनची ही कॉमेडी रील तुफान व्हायरल होत आहे. अलिकडेच एका मुलाखतीत शिखर धवनने सांगितले की, "होय मी आयुष्यात पुढे जाण्याचा निर्णय घेतला आहे. मी असे नाही बोलणार की मी दुर्दैवी होतो, कारण यातून मला अनेक अनुभव मिळाले आहेत. जे मला आता काम येतील. तो माझ्यासाठी शिकण्याचा टप्पा होता." शिखर आणि सोफीच्या व्हिडीओवर कमेंट्सचा पाऊस पडत आहे.

सोफी शाइन कोण?

शिखर धवनच्या ज्या मुलीसोबत अफेअरच्या चर्चा रंगल्या आहेत, ती नेमकी कोण जाणून घेऊयात. सोफी शाइन ही आयरिश प्रोडक्ट सल्लागार आहे. तिने लिमेरिक इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मधून मार्केटिंग आणि मॅनेजमेंटची पदवी घेतली आहे. तिने आयर्लंडमधील कॅसलरॉय कॉलेजमध्ये शिक्षण घेतले आहे. ती अबु धाबी, UAE येथे स्थित नॉर्दर्न ट्रस्ट कॉर्पोरेशनमध्ये द्वितीय उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहे.

Shikhar Dhawan Video
Riteish Deshmukh : 'बिग बॉस'ची ट्रॉफी उचलल्यामुळे सूरजवर सिनेमा बनला? रितेश देशमुखनं दिलं उत्तर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com