पंजाब किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु हे दोन्ही संघ धरमशाळेती एचपीसीए स्टेडियमवर आमने सामने येणार आहेत. दोन्ही संघ सध्या ८-८ गुणांसह प्लेऑफच्या शर्यतीत टीकून आहे. जो संघ हा सामना जिंकेल तो संघ प्लेऑफच्या शर्यतीत पुढे जाईल. तर पराभूत होणारा संघ स्पर्धेतून बाहेर पडेल. त्यामुळे दोन्ही संघांसाठी हा सामना अतिशय महत्वाचा असणार आहे. दरम्यान जाणून घ्या कशी असेल या दोन्ही संघांची प्लेइंग ११.
गेल्या काही सामन्यांपासून शिखर धवन संघाबाहेर आहे. या सामन्यातही त्याचं कमबॅक होण्याची शक्यता खूप कमी आहे. पंजाबकडून जॉनी बेअरस्टो चांगली कामगिरी करतोय. त्याने गेल्या ५ डावात २६१ धावा केल्या आहेत. त्यामुळे या सामन्यातही त्याच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा असणार आहे. पंजाबच्या संघात फार बदल होणार नाहीत.
जॉनी बेयरस्टो, रिले रुसो, शशांक सिंग, सॅम करेन (कर्णधार), जितेश शर्मा (यष्टीरक्षक), आशुतोष शर्मा, हरप्रीत बराड़, हर्षल पटेल, कगिसो रबाडा, राहुल चाहर, अर्शदीप सिंगम
इम्पॅक्ट प्लेअर: प्रभसिमरन सिंग.
रॉयल चॅलेंजर्ल बंगळुरु संघाविरुद्ध बोलायचं झालं, बंगळुरु संघातील सर्व खेळाडू फिट आहेत. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाकडून रजत पाटीदार चांगली कामगिरी करतोय. त्याने मधल्या षटकांमध्ये येऊन चांगली फलंदाजी केली आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघासाठी आज होणारा सामना हा अतिशय महत्वाचा असणार आहे. त्यामुळे विराट, डू प्लेसिससह रजत पाटीदारची बॅट चालणंही तितंकच गरजेचं आहे.
विराट कोहली, फाफ डु प्लेसिस (कर्णधार), ग्लेन मॅक्सवेल, विल जॅक्स, कॅमरन ग्रीन, दिनेश कार्तिक, कर्ण शर्मा, स्वप्निल सिंग, यश दयाल, विजयकुमार वैसाख, मोहम्मद सिराज.
इम्पॅक्ट प्लेअर: रजत पाटीदार
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.